क्राईम न्युजमावळ

सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक व वडगाव मावळ पोलीस स्टेशन याची मटका, जुगारवर धडक कारवाई.

कारवाई मध्ये मटक्याचे साधनासह 71305/- मुद्देमाल जप्त.

Spread the love

सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक व वडगाव मावळ पोलीस स्टेशन याची मटका जुगारवर धडक कारवाई ; कारवाई मध्ये मटक्याचे साधनासह 71305/- मुद्देमाल जप्त.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत , २३ डिसेंबर.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फतमिळालेल्या माहितीच्या आधारे वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव फाटा येथील हॉटेल जोर्तीलींग जवळ उंबराळी देवी ॲटो गॅरेज या ठिकाणी कल्याण मटका नावाचा जुगार चालु आहे.

त्याप्रमाणे  सत्यसाई कार्तीक यांनी त्यांचे कार्यालयाकडील पथक तसेच वडगाव मावळ पोलीस
स्टेशन कडील पोलीस निरीक्षक कदम यांना कळविले, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक  कदम यांनी
वडगाव मावळ पोलीस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी व  सत्यसाई कार्तीक यांचे
कार्यालयाकडील पथक असे मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले.

बातमी ठिकाणी पोलीस कर्मचारी गेल्यानंतर त्या ठिकाणी उंबराळी ॲटो गॅरेजमध्ये एक इसम हातात तांबुस रंगाचे पावती पुस्तक व एक बॉल बेन घेवुन बसलेला दिसला त्यावेळी त्यास ताब्यात घेवुन नाव विचारले असता
त्यांनी त्याचे नाव रविंद्र मोरेश्वर हवालदार असे सांगितले व ते राकेश सतिश भोर यांचे मार्फतीने
मटका चालवत आसल्याचे सांगितले. त्यांचे समोर इतर ६ इसम मटका खेळत आसताना मिळुन
आल्याने त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांचेकडुन एकुण ७१३०५ ( 71305 ) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्ता
करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक  अंकित गोयल, अपर पोलीसअधीक्षक  मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक  कदम, सपोनि राऊळ, पोसई चव्हाण, पोसई भोसले,
पोहवा/बनसोडे, पोहवा / कवडे, व वडगाव पोलीस स्टेशन कडील पोलीस कर्मचारी यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!