ताज्या घडामोडी

स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर मेहनत हाच त्यावर पर्याय आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी मेहनत करावी – सुनील शेळके.

Spread the love

स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर मेहनत हाच त्यावर पर्याय आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांनी मेहनत करावी – सुनील शेळके.If you want to survive in the competition, hard work is the only option. Students should work hard for it honestly – Sunil Shelke.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २४ डिसेंबर.

तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना शेळके म्हणाले की, यश आपोआप आपल्याकडे खेचले जाईल. वेळेचे नियोजन करावे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी वेळेचे नियोजन अतिशय महत्वाचे आहे. स्नेहसंमेलनाचे ध्वजारोहण शाळेचे माझी विद्यार्थी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार शेळके व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत उपक्रमांची माहिती जाणून घेतली विद्यालयाने अशा प्रदर्शनाच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचा नक्कीच फायदा होत असतो.’ असे मत यावेळी सुनिल शेळकेंनी व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी आमदार शेळके, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे संस्थेचे सचिव संतोष खांडगे, प्रमुख वक्त्या डॉ. संज्योत वैद्य, संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के, संचालक सोनबा गोपाळे, दामोदर शिंदे, दादासाहेब उऱ्हे, डॉ. शाळिग्राम भंडारी, अनिकेत काळोखे, प्राचार्या वासंती काळोखे यांच्यासह विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मोठ्या संख्येने पालक माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाचे हस्तलिखिताचे प्रकाशन संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयातून प्रतिवर्षी घेण्यात येणाऱ्या क्रीडा बौद्धिक स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगभूत मुलांच्या विकासाला वाव मिळतो असे मत स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.

यावेळी नृत्य नाट्य अभिनय इत्यादी कलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष महेशभाई शहा यांनी केले सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रभा काळे यांनी तर आभार प्राचार्या वासंती काळोखे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!