क्रीडा व मनोरंजनमावळ

सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.

सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर मध्ये स्नेहसंमेलन शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी बालवाडी ते इ.१०वी असे अत्यंत आनंदात साजरे झाले

Spread the love

सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे.The Annual Snehasamelan of the Saraswati Vidya Mandir of the Saraswati Educational Institution was celebrated with enthusiasm.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ डिसेंबर.

सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर मध्ये स्नेहसंमेलन शुक्रवार दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी
बालवाडी ते इ.१०वी असे अत्यंत आनंदात साजरे झाले.दोन सत्रात साजरे झालेले हे स्नेहसंमेलन बालवाडी व माध्यमिक सकाळच्या सत्रात व इ. १ली ते ७वी प्राथमिक विभागाचे दुसऱ्या सत्रात साजरे झाले.सकाळच्या सत्रात अनंत दाणी ( उपशिक्षण अधिकारी जिल्हा परिषद ,पुणे माध्यमिक विभाग ) , विठ्ठलराव शिंदे (मा.सभापती पंचायत समिती मावळ) हे दोघे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणिती वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते ,त्याचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या मनोगतात माननीय अनंत दाणी सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानाची कवाडे त्यांना पुढे कशी खुली आहेत याबद्दल सांगितले तर शिक्षकांसाठी मार्गदर्शन करताना शिक्षकांनी देखील स्वतःची गुणवत्ता वाढवली पाहिजे असे सांगितले तर विठ्ठल राव शिंदे यांनी सरस्वती शिक्षण संस्थेने परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे त्यामुळे आज संस्थेचा नावलौकिक मावळ तालुक्यात आहे असे मनोगत व्यक्त केले.
तर दुपारच्या सत्रात मुकुंद तनपुरे (केंद्रप्रमुख लोणवळा)व मा.श्री. सुहास धस ( केंद्रप्रमुख सांगिसे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना सुहास धस सर यांनी पालकांना आवाहन केले की आपल्या पाल्याला जास्तीत जास्त पुस्तक वाचन करण्यास सांगा आज कालची मुले वाचन कमी व ऑनलाईन वेळ जास्त घालवत आहे वाचनातून व्यक्तिमत्व घडते तर  मुकुंद तनपुरे सरांनी सरस्वती शिक्षण संस्थेत केवळ शैक्षणिकच नाही तर सुसंस्कारित विद्यार्थी घडण्यासाठी संस्था सदस्य व सर्व शिक्षक कार्यरत असल्यामुळेच या शाळेकडे पालकांचा कल जास्त आहे असे मनोगत व्यक्त केले .दोन्ही विभागातून दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

ईशस्तवन व स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. अहवाल वाचन बालवाडी प्रमुख सोनाली काशिद ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केले. प्रथम सत्रात प्रास्ताविक सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी तर द्वितीय सत्रात संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड यांनी केले. तसेच हस्तलिखित मासिकाचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक वितरणाचे वाचन प्रथम सत्रात सुरेखा रासकर व द्वितीय सत्रात कु. अर्चना भोते यांनी केले.

नात …रक्ताच असत! नात ….भक्ताच असत! नात .. ..भावभावनांच असत! अशाच नात या थीम मधून विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमात सादरीकरण बालवाडी ,प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले. या विविध गुणदर्शनचे वाचन माध्यमिक विभागात सुमित आठल्ये व स्वरांगी चाफेकर तर प्राथमिक विभागात
सोनल शेटे , शोभा जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड सर, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी,कार्यवाह प्रमोद देशक, खजिनदार  सुचित्रा चौधरी, शिक्षण समिती सदस्या डॉ. ज्योतीताई चोळकर ,सदस्य  सुनिल आगळे सर, विश्वास देशपांडे तसेच इंदोरीच्या बालवाडी विभाग प्रमुख अनुराधा बेळणेकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक  नितीन शिंदे हे सर्वजण उपस्थित होते तसेच सर्व पत्रकार, पोलीस, सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विभागाच्या  सुनिता कुलकर्णी तर प्राथमिक विभागाचे सूत्रसंचालन कु.अस्मिता ढावरे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन माध्यमिक विभागात बालवाडी शिक्षिका. अर्चना एरंडे. तर प्राथमिक विभागात  अनिता कुंभार यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!