मावळसामाजिक

कार्ला ते मळवली दरम्यान इंद्रायणीनदीवरील पूल नूतनीकरणासाठी पाडला.

पुलाला पाडण्याऐवजी जवळच समांतर असाच पूल बवनला असता, तर शासनाचे पैसे वाचले असते

Spread the love

कार्ला ते मळवली दरम्यान इंद्रायणीनदीवरील पूल नूतनीकरणासाठी पाडला.The bridge over Indrayani Nadi between Karla and Malvali was demolished for renovation.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी २६ डिसेंबर.

कार्ला ते मळवली दरम्यान इंद्रायणीनदीवरील पूल नूतनीकरणासाठी पाडला असून नवीन पूल होईपर्यंत पुलाचे बाजूलाच मो-या टाकून मुरूम मातीचा भराव टाकून तात्पुरती वाहतूक व्यवस्था सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे केली आहे.

मळवली मार्गे लोहगड, विसापूर किल्ल्यावर जायला, भाजे लेणीवर जायला यायला मोठ्या संख्येने वाहनचालक कार्ला फाटा मार्गे येतात. औंढेखुर्द येथील पुलावरूनही शेकडो पर्यटक ये जा करतात. माञ कार्लाफाटा नजीक असल्याने पर्यटकांना रोज जा ये करणे, या पुलावरून सोपे होते ! पण या पुलावरून दोन फोरव्हीलर गाड्यांना अडचणीचा रस्ता व अरूंद पूल असल्यामुळे, ये जा शक्य होत नव्हते, त्यामुळे हा पूल सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधलेला असूनही पाडण्यात आला आहे.

पूर्वी साखळी असलेला पाण्याचेवर थोडाफार उंच असा साकव पूल रहदारीसाठी होता. रहदारी वाढली. बैलगाडी ऐवजी मोटारकार , ट्रक आले आणि हा पूल धोकादायक वाटू लागल्याने पाडून नवीन उंच पूल बनवला.

या पुलाला पाडण्याऐवजी जवळच समांतर असाच पूल बवनला असता, तर शासनाचे पैसे वाचले असते, आणि नागरिकांची सहा महिने होणारी गैरसोय टळली असती, जनतेच्या खिशातील पैशाचा असा अपव्यय.

हे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काम होत असून नवीन अत्याधुनिक पूल बांधताना बाजूला कोल्हापूर टाईपचा नदीवर बंधाराही बांधल्यास पाणी साचून राहीन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!