आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनमावळ

श्री भैरवनाथ विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ दिमाखात संपन्न.

Spread the love

श्री भैरवनाथ विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ दिमाखात संपन्न.The annual convocation ceremony of Shri Bhairavanath Vidyalaya was concluded in Dimakha.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २६ डिसेंबर.

भारतीय संस्कृतीनुसार सर्व मान्यवरांचे ढोल लेझीमच्या अप्रतिम सूर तालात स्वागत करण्यात आले. विज्ञान प्रदर्शन- रांगोळी प्रदर्शन- या दालनांचं मान्यवरांच्या शुभहस्ते विधिवत उद्घघाटन करण्यात आले. अप्प दिपो भव- हा संदेश देणाऱ्या पवित्र प्रसन्न वातावरणात दीपप्रज्वलन मानवरांच्या हस्ते झाल्यानंतर- सन्मानपूर्वक सर्व मान्यवर- व्यासपीठावर विराजमान झाले.

संस्थेचे सहचिटणीस प्राध्यापक वसंत पवारसरांनी सर्व मान्यवरांचा परिचय-स्वागत आणि प्रस्ताविक अतिशय समर्पक शब्दात सादर केल! माजी सरपंच विश्वनाथ मराठे- संस्थेचे खजिनदार  नंदकुमार शेलार-  भसे सर- विशेष अतिथी- निवृत्त टेक्निकल डायरेक्टर महाराष्ट्र स्टेट-  अनिल अंधारेसर जळगावचे उद्योजक  अविनाश नांदेडकर या सर्व मान्यवरांनी शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण सादर केलेल्या विज्ञान प्रदर्शन आणि अप्रतिम रांगोळी प्रदर्शनाचा उल्लेख आपल्या मनोगतात व्यक्त करून विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.

मुख्याध्यापिका ललिता कांबळे मॅडम यांनी- शाळेच्या अहवालातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आलेख सादर केला! प्रमुख पाहुणे डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची सुरुवातच मुळी उत्सावर्धक गीतातून केली! त्यानंतर विविध दृष्टांत- काव्यरचना- काही वास्तव घटनांचा आधार घेत घेत डॉक्टरांनी- आपलं आरोग्य आपल्या हाती- सार्वजनिक संभाषण कौशल्य- प्रत्येकाच्या आयुष्यातील ज्ञान आणि सेवेचे महत्व या मानवी जीवनाच्या विविध पैलूवर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांशी अतिशय हळुवार शब्दात संवाद साधला! आपल्या अध्यक्षीय भाषणात  यादवेंद्र खळदे यांनी संस्थेचे सचिव या नात्याने आलेल्या सर्व पाहुण्यांचे सर्वप्रथम स्वागत केले .त्यानंतर विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगती साठी प्रयत्नशील असलेल्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम- सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.शाळेच्या सर्व स्तरावरील प्रगतीसाठी वराळे ग्रामस्थांनी आपले सहकार्य सातत्याने द्यावे- ही त्यांनी संस्थेतर्फे विनंती केली.

वराळे तालुका मावळ येथील –श्री भैरवनाथ विद्यामंदिर स्नेहसंमेलन- अध्यक्षस्थान- श यादवेंद्र खळदे- प्रमुख पाहुणे- लेखक व्याख्याते डॉक्टर शाळीग्राम भंडारी- विशेष अतिथी – मा सरपंच विश्वनाथ मराठे- जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे- संस्थेचे खजिनदार  नंदकुमार शेलार सहचिटणीस प्राध्यापक वसंत पवार- माजी मुख्याध्यापक भसेसर- निवृत्त टेक्निकल डायरेक्टर  अनिल अंधारे सर- उद्योगपती अविनाश नांदेडकर मुख्याध्यापिका ललिता कांबळे मॅडम- सर्व शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात संपन्न–

हा संपूर्ण स्नेहसंमेलनाचा समारंभ सर्वार्थाने यशस्वी होण्यास ज्या ज्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले त्यापैकी विज्ञान प्रदर्शन-  रोहिणी जंजिरे, रांगोळी प्रदर्शन व आभार प्रदर्शन- वर्षाराणी दगडे, उत्कृष्ट सूत्रसंचालन बाळासाहेब गाढवे सर याबरोबरच इतर कला शिक्षकांनी घेतलेल्या विशेष परिश्रमातून दुसऱ्या सत्रात- विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीत नाट्य नृत्य विविध कलागुणांनी गावकऱ्यांची मने जिंकली उपस्थिताच्या आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!