आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय साहित्य साधने मोजमाप शिबिर संपन्न.

सदर शिबिरात कर्णदोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अंध प्रवर्गातील ५१ दिव्यांग विद्यार्थ्यांची त्यांच्या गरजेनुसार तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी.

Spread the love

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय साहित्य साधने मोजमाप शिबिर संपन्न.Taluka level material equipment measurement camp for disabled students completed.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २८ डिसेंबर.


पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित, पंचायत समिती मावळ शिक्षण विभाग समावेशित शिक्षण मावळचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय सुदाम वाळुंज  व पुणे जिल्हा परिषद पुणे चे जिल्हा समन्वयक  ज्ञानदेव देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली-फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स कंपनी शिरूर व CSR अंतर्गत मावळ तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य देण्याकरिता मोजमाप शिबिर दि.२७ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा वडगाव ता.मावळ येथे घेण्यात आला.


सदर शिबिरात कर्णदोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, अंध प्रवर्गातील ५१ दिव्यांग विद्यार्थ्यांची त्यांच्या गरजेनुसार तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून श्रवण यंत्र, व्हीलचेअर,  कॅलिपर, मॉडीफाय चेअर, स्मार्टफोन, व्हाईट केन इत्यादी साहित्य साधनांसाठी संदर्भित करण्यात मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी. सुदाम वाळुंज साहेब व समावेशित शिक्षण जिल्हा समन्वयक  ज्ञानेश्वर देवकाते शिबिरास उपस्थित राहून दिव्यांग विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला.सदर तपासणी शिबिरास फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव कंपनीचे सीएसआर व्यवस्थापक  अमोल फटाले  व त्यांची अलिम्को टीम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक  साबळे मॅडम, राजश्री घोरपडे  व शिक्षक वृंद, समावेशित शिक्षण विशेष साधन व्यक्ती शितल शिशुपाल, विशेष शिक्षक स्मिता जगताप, साधना काळे, शकीला शेख, सुमित्रा कचरे, लता वनवे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!