ताज्या घडामोडी

५१ व्या मावळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज,कान्हे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश

Spread the love

५१ व्या मावळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज,कान्हे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश. 

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २९ डिसेंबर.

५१ व्या मावळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री.छत्रपती शिवाजी विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज,कान्हे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून बक्षिसे प्राप्त केली. विज्ञान प्रकल्प मोठा अपंग विद्यार्थी गट प्रथम क्रमांक- चि.आकाश पुजारी विज्ञान प्रकल्प लहान अपंग विद्यार्थी गट-द्वितीय क्रमांक- कु.समिक्षा साठे.

लहान गट निबंध स्पर्धा तृतीय क्रमांक- कु.धनश्री ठाकर अपंग गटातील दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची जिल्हा पातळी विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रभारी मुख्याध्यापिका  सविता चव्हाण, शहाजी लाखे, श्रद्धा मोहोळ, दिक्षा पवार, राम कदमबांडे, रियाज तांबोळी, सोमनाथ साळुंके यांचे  खूप खूप अभिनंदन करण्यात आले

या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री. संजय तथा बाळा भेगडे, सचिव. संतोषजी खांडगे आणि शालेय समिती अध्यक्ष.यादवेंद्रजी खळदे यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!