आरोग्य व शिक्षण

मंदिरे खुली करण्यासाठी मनसेच्या वतीने एकविरा पायथ्याशी आंदोलन

Spread the love

लोणावळा : महाराष्ट्रातील हिदूंची मंदिरे खोलावीत या मागणीसाठी मनसेच्या वतीने राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी व ठाकरे घराण्याची कुलदेवी आई एकवीरा देवीच्या कार्ला पायथ्याशी घंटानाद आंदोलन मावळ तालुका मनसे च्या वतीने करण्यात आले.आघाडी सरकारचा निषेध करत मंदिर लवकरात लवकर भाविकांसाठी खुली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा पुढील काळात राज साहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक मंदिर भाविकांसाठी खुले करतील. असा इशारा मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर यांनी दिला,

कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या मंदाराच्या प्रवेशद्वारावर आज हिंदूंची मंदिरे खुली करावीत  व हिंदूंच्या सणावरील बंदी हटवावी  या मागण्यांसाठी वेहेरगावच्या मंदिरासमोर मनसे नेते जिल्हाध्यक्ष रविंद्र गारूडकर आणि महाराष्ट्र सरचिटणीस हेमंत संभुसे यांचे उपस्थितीमधे घंटानाद आंदोलन करून आघाडी सरकारचा तालीबानी सरकार असा उल्लेख करीत तीव्र निषेद करण्यात आला. यावेळी एकविरा देवीची आरती  करण्यात आली.

यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, सरचिटणीस हेमंत संभुस, पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड रविंद्र गारुडकर, सचिन भांडवलकर, नरेंद्र तांबोळी, सचिन पांगारे, पंकज गदिया, महादेव मते,अशोक कुटे, योगेश हुलावळे, भारत चिकणे, अमित भोसले,दिनेश कालेकर,अनिल वरघडे, मोझेस दास,भरत बोडके, संजय शिंदे, पांडुरंग असवले, निरंजन चव्हाण,विजय भानुसघरे,दिपक सोनवणे,किरण गवळी,जाॕर्ज दास, रमेश म्हाळस्कर, संदिप पोटफोडे, अमित बोरकर, नाथा पिंपळे, दशरथ लोखंडे, नरेश आहेर, सोमनाथ केदारी, अजय स्वामी, आकाश शेटे, उमेश पवार, यांंच्यासह मनसेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!