आरोग्य व शिक्षण

बजाज लसीकरण मोहिमेनंतर लोणावळ्यात राजकीय धुळवड

Spread the love

लोणावळा : तालुक्यात मंगळवारी बजाज कोरोना लसीकरण मोहीम पार पडली. लोणावळा शहरात लसीकरणासाठी 14 केंद्र तयार केली गेली होती. लोणावळा येथील काही केंद्रांवर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा यांच्या वतीने नागरिकांना लसी करणासाठी टोकन वाटप करण्यात आले होते.

मंगळवारी या लसीकरण मोहीमेच्या निमित्ताने तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी शहरातील केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी नांगरगाव येथे आमदारांनी टोकन वाटप पद्धतीवर टीका करत राग व्यक्त केला. यावर नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी आमदारांनी चमकोगिरी करू नये .लोणावळ्यासाठी मी सक्षम आहे असे प्रत्युत्तर दिले.त्यावरून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांचा निषेध केला. तसेच सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या.

गुरुवारी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगराध्यक्षा व भाजपचा निषेध केला. तर भाजपा महिला आघाडीने नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी धनंजय काळोखे यांच्या विरोधात आंदोलन केले. तसेच पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष  मंजुश्री वाघ यांनी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत त्यांना खडे बोल सुनावले. नगराध्यक्षांनी यावर बाहेरच्यांनी शहरातील वातावरण खराब करू नये अशी टीका केली.

एकूणच लसीकरण मोहिमेनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून शहरात राजकीय धुळवड चांगलीच रंगली आहे. दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. शहरात सर्वाधिक लसीकरण झाल्याने मोहीम यशस्वीपणे पार पडल्याने नागरिक समाधानी असले तरी या राजकीय धुळवडीमुळे आगामी निवडणूक चांगलीच रंगणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!