निधनवार्तामावळ

पाटणमधील तरूण विवाहिता उषाताई मांडेकर यांचे निधन.

Spread the love

पाटणमधील तरूण विवाहिता उषाताई मांडेकर यांचे निधन.Ushatai Mandekar, a young married woman from Patan, passed away.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी.

पाटणमधील तरूण विवाहित सामाजिक कार्यकर्त्या.उषाताई अरूण मांडेकर (वय-३५ ) यांचे अकस्मिकपणे ता.६रोजी दुपारच्या सुमारास स्वाध्याय परिवारात असताना भावफेरीसाठी गावात गेल्या होत्या .तेथेच त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यांना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे निधन झाले. त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीनंतर लोणावळा ग्रामिणचे पोलिसांकडून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

मळवलीत रेल्वेगेटवर बराच वेळ गेट मोकळे न मिळाल्याने त्यांना हाॕस्पिटलमधे नेण्यास थोडा उशीर झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे पार्थिवावर राञी साडेआठ ते नऊ दरम्यान पाटणच्या स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शेकडो ग्रामस्थ , नातेवाईक व सगेसोयरे उपस्थित होते.त्यांचे पश्चात पती , तीन दीर , जावा , सासू ,एक लहान मुलगा, ३ मुली असा परिवार आहे.
रेल्वेकामगार अरूण मांडेकर हे त्यांचे पती होत. टेल्को चे कामगारनेते सुभाष मांडेकर हे थोरले दीर ; माजी पंचायत समिति सदस्या लीलाबाई दत्ताञेय मांडेकर या जाऊबाई होत. तसेच पाटणमधील तिकोणे परिवार यांच्या त्या जवळच्या नातेवाईक होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!