अध्यात्मिकमावळसामाजिक

संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे गाथा लेखक संतश्रेष्ठ शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी साजरी.

श्री विठ्ठल मंदिर शाळा चौक तळेगाव दाभाडे येथे कसाबी परिवाराच्या वतीने पुण्यतिथीच्या निमित्त सकाळी सहा वाजता महापूजा करण्यात आली.

Spread the love

संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे गाथा लेखक संतश्रेष्ठ शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी साजरी.Celebrating the death anniversary of Santshrestha Shiromani Shri Santaji Maharaj Jaganade, author of Abhanga saga of Santshrestha Shri Jagadguru Tukaram Maharaj.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ जानेवारी.

संतश्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे गाथा लेखक संतश्रेष्ठ शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीच्या औचित्य साधून संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री विठ्ठल मंदिर शाळा चौक तळेगाव दाभाडे येथे कसाबी परिवाराच्या वतीने पुण्यतिथीच्या निमित्त सकाळी सहा वाजता महापूजा  महेंद्र विश्वनाथ कसाबी व तेली समाज तळेगाव शहर उपाध्यक्ष  संजय विश्वनाथ कसाबी यांच्या हस्ते पार पडली.

या वेळी ह. भ. प. श्री ज्ञानेश्वर महाराज दाभाडे यांनी श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या कार्याला उजाळा दिला. व त्यांची महती समाजापुढे मांडली यावेळी  किरण गवारे तेली समाज अध्यक्ष. बाळकृष्ण शिरसागर सचिव  प्रदीप टेकवडे श् प्रकाश वाघझाडे गोकुळ किरवे तुषार जगनाडे अतुल जगनाडे अभिजीत कसाबी योगेश कसाबी मंदार कसाबी  नंदकुमार किरवे आदित्य कसाबी. अजय शेलार स्वप्निल बारमुख सार्थक कसाबी ऋषिकेश कसाबी अनिकेत वैरागी आदि मान्यवर उपस्थित होते.

मारुती मंदिरात श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन तेली समाजाचे अध्यक्ष‌. बाळकृष्ण शिरसागर यांच्या हस्ते पार पडले या वेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी ह भ प श्री संतोष महाराज काळोखे देहूकर यांचा सुश्रव्य कीर्तनाचा कार्यक्रम व महाप्रसाद समस्त कसाबी परिवारा च्या वतीने आयोजित केला होता. वारकरी संप्रदायातील व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतरन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी ५०० / ६०० नागरिकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!