क्रीडा व मनोरंजनसामाजिक

शिरूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक शालेय वाटप.

Spread the love

शिरूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक शालेय वाटप.Educational School Allotment in Shirur Zilla Parishad Primary School.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, ११ जानेवारी.

बुधवार दि. १० जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वखारीचा मळा (वढू बुद्रुक), ता. शिरूर, जि. पुणे येथे क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा  सीमा राजेंद्र वखरे व महाराष्ट्र अध्यक्षा श्रावणी कामत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा साहित्य प्रतिष्ठान लोनावळा/मुंबई, उद्योजक अमृतलाल नगडा, मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ,किटी ग्रुप व ॲड. ‌धनंजय कोद्रे या सर्वांच्या सहकार्याने शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये स्कूल बॅग, कंपास पेटी, टिफिन बॉक्स, पेन या गोष्टींचा समावेश होता. तसेच मुलांसाठी खाऊ म्हणून चिक्की, बिस्कीटचे पुडे, लाडू, चिवडा देण्यात आले‌.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप ढोकले यांनी प्रास्ताविक करताना शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव शिवले यांनी भविष्यात ही शाळा संपूर्ण डिजिटल करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने विविध कौशल्ये आत्मसात करावीत असे मत व्यक्त केले.

प्राथमिक शाळेतच खऱ्या अर्थाने संस्कारांची पायाभरणी होते. तसेच शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देतात, असे मनोगत लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगरचे उपाध्यक्ष अमितकुमार टाकळकर यांनी व्यक्त केले.

भविष्यात शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही स्वरूपातील मदत लागल्यास आम्ही निश्चितच कटिबद्ध राहू असे आश्वासन श्रावणी कामत व ॲड. धनंजय कोद्रे यांनी दिले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अंकुश शिवले, चंद्रकांत शिवले, भाऊसाहेब शिवले, गोरख शिवले, नवनाथ शिवले यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शाळेतील सहशिक्षक भाऊसाहेब ठोंबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!