लोणावळासामाजिक

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणीनदीवरील पूल पर्यायी रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा.

Spread the love

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणीनदीवरील पूल पर्यायी रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा.Bridge over Indrayani Nadi on Karla Malvali Marg is an alternative road inviting accidents.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १० जानेवारी.

कार्ला मळवली मार्गावरील इंद्रायणीनदीवरील पूल पर्यायी रस्ता अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असून मातीच्या रस्त्यावर टँकर चे पाणी सांडून वाहने घसरतात व अपघात होत असल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे. या मार्गावर रस्त्याचे रूंदीकरण करून त्यावर बारीक खडी टाकून रोलरने दाबून घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.

कार्ला पुलाचे बांधकामासाठी पर्यायी रस्त्याची सोय केली असून हा रस्ता माती टाकून बनविला असून त्यावर खडीकरण डांबरीकरण न केल्याने टँकर चे पाणी उताराला सांडून त्यावरून मोटारसायकलवर घसरून पडत आहेत. नुकताच काल या रस्त्याचे ठिकाणी मोटारसायकलवर नागेश हुलावळे हे रस्त्यावर पाणी सांडून रस्ता निसरडा झाल्याने त्यांची मोटारसायकल घसरून अपघात होऊन त्यांना सायलेंसरने पायाला भाजले आहे, या अपघातास येथील ठेकेदार जबाबदार असून पर्यायी रस्ता नीटपणे रूंदीकरण न केल्याने अपघाताची शक्यता आहे. या रस्त्याचे रूंदीकरण करावे व खडीकरण करावे , रोलरने दाबून घ्यावे , अशी मागणी कार्लाचे माजी ग्रामपंचायत सदस्य व मनसेचे तालुका कोअरकमिटी सदस्य सुरेशभाऊ जाधव आणि मनसेचे तालुका उपाध्यक्ष आणि पाटणचे माजी सरपंच आनंता तिकोणे यांनी केली आहे.त्यांनी पाहणी करून याबाबत रस्त्याचे रूंदीकरण करण्याबाबत येथील यंत्रसामग्री हाताळणारे कामगारांना अपघाताचीही कल्पना देवून या पर्यायी रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!