Puneआपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा..

तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा..

Spread the love

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा ;  तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा.Washing machine facility for inmates of Yerwada Central Jail; Also biometric touch screen facility.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, १४ जानेवारी.

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी वॉशिंग मशीन सुविधा तसेच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली. सदर सुविधेचे उद्घाटन अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

सन्मा. सर्वोच्च न्यायालयाच्या ई-कमिटी मार्फत संनियंत्रण करण्यात येत असलेला ICJS (Interoperable Criminal Justice System)
प्रकल्प ज्यामध्ये सन्मा. न्यायालयाचे ई-कोर्टस (eCourts) संगणकीकरण प्रकल्प, पोलीस विभागाचा सी.सी.टी.एन.एस. (CCTNS)
संगणकीकरण प्रकल्प कारागृह विभागाची ई-प्रिझन (ePrisons) संगणकीकरण प्रकल्प, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांची ई-फॉरेन्सिक
(eForensic) प्रणाली व पब्लीक प्रॉसिक्युशन विभागाची संगणकीकरण प्रणाली यांचेमध्ये आपापसांत माहितीची देवाणघेवणा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र शासन, गृह विभाग, तुरुंग- २ यांचे पत्र दि.१७.०३.२०२१ रोजीच्या
पत्रानुसार एन. आय. सी. (NIC) यांनी विकसित केलेली ई-प्रिझन (ePrisons ICJS) प्रणाली महाराष्ट्रातील सर्व कारागृहात लागू करण्यात आलेली आहे.
प्रस्तुत प्रकरणी सन्मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती. उदय ललित यांनी दि. २७.०३.२०२२ रोजी मुंबई मध्यवर्ती कारागृह तसेच मुंबई जिल्हा महिला कारागृह येथे भेट दिली असता खालीलप्रमाणे पुर्तता करणेबाबत आदेशित केलेले आहे.
“Hon’ble Justice Shri. Uday Lalit expressed great concern about overcrowding at these jails.

या शिवाय मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे क्रिमिनल जनहित याचिका क्र. ०८ / २०२२ नुसार कारागृहातील बंदीस्त बंद्यांना
ई-मुलाखत (ई-प्रिझन्स प्रणालीतील) या सुविधेचे लाभ देण्यात येत आहे. कारागृहातील बंद्याच्या त्यांच्या नोतवाईकांसोबत व वकिल मुलाखती या ऑनलॉईन सुरु करण्यात आलेल्या आहेत. बंदयाच्या नातेवाईकांना व वकिलांना ई-मुलाखत ॲपव्दारे काही दिवस अगोदर
मुलाखत आरक्षित करता येवू शकणार आहेत.
Biometric Touch Screen e-Kiosk Machine व्दारे कारागृहातील बंद्यांना पुढिल प्रकारची माहिती स्वतः पाहता येणार आहे.

कारागृहांमध्ये शिक्षाधिन, न्यायाधीन बंदी शिक्षा भोगत असतात. त्यामुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगत
असताना त्यांना आवश्यक असणारी मुलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे. यामध्ये वैद्यकिय सुविधेचा देखील
समावेश होतो. तसेच कारागृहामध्ये बंद्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ नये
याकरिता सन्मा. न्यायालयाच्या न्यायनिर्देशानुसार कारागृहातील बंदीजणांना वैद्यकिय सुविधा तत्परतेने पुरविणे
बंधनकारक आहे. त्यामुळे कारागृहांमध्ये असणाऱ्या वैद्यकिय सोई सुविधेमध्ये वाढ करणे व त्याचे आधुनिकीकरण
1/3 करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व कारागृहातील बंद्यांच्या आरोग्य विषयक गरजा समजून घेवून कारागृहातील बंद्यांमध्ये असणा-या आजारांमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप मोठया प्रमाणात आहे. त्यातही स्कीन संबंधी आजार (त्वचारोग) मोठया प्रमाणात आढळून येतात यावर उपाययोजनांपैकी एक उपाययोजना म्हणजे बंद्यांना नियमितपणे वापरासाठी बिछाने व कैदी कपडे स्वच्छ धुवून व निर्जतकीकरण करुन देणे आवश्यक आहे. याकरिता तिहार कारागृह, नवी दिल्ली येथे बाशिंग मशिनचा वापर सुरु करण्यात आलेला आहे.

त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कारागृहांना
वाशिंग मशिन पुरवठा करण्यात येणार आहे. राज्यातील इतर सर्व कारागृहांनी एकूण १९३ नग वाशिंग मशिनची मागणी
नोंदविलेली आहे. प्रायोगिक तत्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे नऊ (०९) नग वॉशिंग मशीन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. सदर ठिकाणी वॉशिंग मशीन उपयोगितेचा आढावा घेवून राज्यातील इतर कारागृहात सुध्दा सदर सुविधा पुरविण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!