क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

वडगावात माळरानावर मोरया प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित पतंग महोत्सवाला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

शहरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सुमारे १२०० ते १३०० पतंग प्रेमींचा मोठ्या उत्साहात सहभाग..

Spread the love

वडगावात माळरानावर मोरया प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित पतंग महोत्सवाला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.Spontaneous response of the city dwellers to the kite festival organized by Morya Pratishthan on Malrana in Vadgaon.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर वडगाव मावळ प्रतिनिधी, १५ जानेवारी.

या पतंग महोत्सवातील मोठ्या पतंगावर प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, माझी वसुंधरा यांच्या प्रतिकृतीचे पतंग आकाशात झेपावल्याने लहानासह नागरिकांनी जल्लोष केला.विविध रंगीबिरंगी पतंग मकरसंक्रांतीचे औचित्य साधून आकाशात उडाल्याचे पहायला मिळाले.श्री.मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. अबोलीताई मयूरदादा ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहरात भव्य पतंग महोत्सवाचे ता.१४ रोजी आयोजन करण्यात आले होते. या पतंग महोत्सवात शहरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सुमारे १२०० ते १३०० पतंग प्रेमी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. सर्वांनी मनसोक्त पतंग उडविण्याचा आनंद लुटला.

यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पतंग प्रेमींना मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून मा. नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीने पतंग आणि दोऱ्याचे रीळ विनामूल्य वाटप करण्यात आले. यावेळी लहान मुले-मुली, युवक तसेच पालकांनी मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद लुटला.

यावेळी काॅंग्रेसचे मा तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, जेष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. प्रविणजी निकम, माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोलीताई ढोरे, श्री पोटोबा देवस्थान विश्वस्त सुभाषराव जाधव, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, अरूणभाऊ चव्हाण, मा उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, मा उपसरपंच तुकाराम ढोरे, मा सभापती गुलाबकाका म्हाळसकर, श्रीधर तात्या ढोरे, बारकूनाना ढोरे, हनुमंतभाऊ म्हाळसकर, शांतारामभाऊ कुडे, पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अतुलजी राऊत, मा नगरसेवक राहुलदादा ढोरे, किरणजी म्हाळसकर, प्रविणजी चव्हाण, पूनमताई जाधव, मायाताई चव्हाण, पूजाताई वहिले, शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुलजी वायकर, उद्योजक युवराज ढोरे, मा उपसरपंच विशालजी वहिले, रा काॅं अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मजहर सय्यद, नितीन चव्हाण, महेंद्र ढोरे, सिद्धेश ढोरे, उद्योजक सचिन कडू, आबा ढोरे, राजेश ढोरे, समीर दौंडे,सागर म्हाळसकर, ऋषभ ढोरे, गणेश बरदाडे, विक्रम ढोरे, रविंद्र काकडे, विनायक भेगडे पुणे काईट्स चे प्रमुख रमेशजी पारते, श्रीकांतजी चेपे आणि वडगाव शहरातील हजारों पतंगप्रेमी, सर्वपक्षीय पदाधिकारी, मोरया महिला प्रतिष्ठानच्या पदाधिकारी संचालिका, मोरया प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि शहरातील लहान मुले-मुली, नागरिक, मित्रपरिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मकरसंक्रांत निमित्ताने घेण्यात आलेल्या या पतंग महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकारचे पतंग प्रत्यक्षात उडवण्याची तसेच पाहण्याची सुवर्णसंधी या नवीन वर्षाच्या सुरुवातीच लहान मुलांना तसेच पालकांना अनुभवायला मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. या पतंग महोत्सवातील मोठ्या पतंगावर प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, माझी वसुंधरा यांच्या प्रतिकृतीचे पतंग आकाशात झेपावल्याने लहानासह नागरिकांनी जल्लोष केला. विविध रंगीबिरंगी पतंग आकाशात उंच भरारी घेत असताना आयुष्यात असणारी मोठ्या उंचीवरील सर्व स्वप्ने अशीच पूर्ण करावयाची असतात, या स्वप्नांचा दोर किती उंच सोडायचा हे आपल्याच हातात असते.

नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानच्या अध्यक्षा. अबोलीताई मयूरदादा ढोरे यांच्या संकल्पनेतून येथून पुढील कालावधीतही वडगाव शहरातील नागरिकांसाठी अशाच सामाजिक, सांस्कृतिक, कला मनोरंजन आणि अत्यावश्यक समाजोपयोगी सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या पतंग महोत्सवाचे आयोजन श्री.मोरया महिला प्रतिष्ठान वडगाव, वडगाव नगरपंचायत, वडगावकर जनता, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष, आणि राष्ट्रवादी काँग्रेस वडगांव शहर यांचेकडून करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!