क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

तळेगाव- ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा 30 वा वर्धापन दिन- शुक्रवार दिनांक 12 जानेवारीला थाटामाटात संपन्न.

Spread the love

तळेगाव- ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा ३० वा वर्धापन दिन- शुक्रवार दिनांक १२ जानेवारीला थाटामाटात संपन्न.Talegaon- The 30th anniversary of Jyeshtha Nagarik Mitra Mandal- concluded on Friday 12th January with pomp and fanfare.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १५ जानेवारी.

अध्यक्षस्थानी  अशोक काळोखे प्रमुख वक्ते- जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पुणे येथील ज्येष्ठ धन्वंतरी- डॉक्टर विनोद शहा- प्रमुख पाहुणे- मावळचे क्रियाशील कर्मयोगी आमदार सुनील आण्णा शेळके- संस्थेस आर्थिक योगदान देणारे- ज्येष्ठ डॉक्टर शाळीग्राम भंडारी  दशरथजी बउले- चांदखेड निवासी  सुमनसेठ शहा, ब्रिजेंद्र किल्लावाला आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्या च्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने वर्धापनदिनाच्या समारंभाची प्रसन्न पवित्र सुरुवात झाली.

 

ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या कार्यवाह  स्नेहल रानडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून मागील सभेचा वृत्तांत सभागृहात सादर केला. प्रमुख वक्ते डॉक्टर विनोद शहा यांनी जेष्ठांना आरोग्य संपन्न आयुष्य प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आपल्या संवादातून दिल्या. वृद्धांच्या बाबतीत घडलेले काही विदारक अनुभव डॉक्टर विनोद शहा सभेपुढे सांगत असताना संपूर्ण सभागृह निशब्द झाले. दुपारच्या रुचकर भोजनाबरोबरच विचारांची शिदोरी सुद्धा ज्येष्ठांनी या डॉक्टरांच्या भाषणातून आपल्याबरोबर नेली.

अध्यक्ष. अशोक काळोखे यांनी सर्व सभासदांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीतील काही संकल्प आपल्या मनोगतात व्यक्त केले. अध्यक्षांच्या मनोगतातील हाच धागाधरून प्रमुख पाहुणे डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी सभासदांची वाढतीसंख्या लक्षात घेऊन सभागृहाचा विस्तारित प्रस्ताव उपस्थितां समोर मांडला. या प्रस्ताव पूर्तीसाठी सर्वतोपरी अर्थसहाय्य करण्याचे उस्फूर्त आश्वासन दानशूर लक्ष्मीपुत्र सुमती शेठ शहा यांनी जाहीरपणे दिले.

त्याचप्रमाणे या सभागृहास आवश्यक असणाऱ्या स्वयंपाक घराच्या नूतनीकरणास आवश्यक ती आर्थिक मदत आपण निश्चित करू असे आपल्या मनोगतात आमदार सुनील अण्णा शेळके यांनी व्यक्त केले. त्याबरोबरच आवश्यक असणारा ओहोरेड- प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यास आपणही आपला आर्थिक सहभाग नोंदवू असे आश्वासन ब्रिजेंद्र किल्लावाला यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.  दशरथ बउले यांनीही शुभेच्छा दिल्या. यावर्षीच्या क्रियाशील कार्यकारणीचे सर्व संकल्प सिद्धीस जातील याची अनुभूती सभासदांनी घेतल्याने प्रचंड टाळ्यांच्या कडकडात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने– वठलेल्या झाडांनाही पालवी फुटावी यासाठी विविध स्पर्धेचे नियोजन- आयोजन केलं गेलं! हा वर्धापनदिन आणि या स्पर्धा सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी ज्यांनी अतोनात कष्ट घेतले– त्यात खास करून- अत्यंत उत्साही, उपाध्यक्ष आशाताई जैन ! अनुभव संपन्न कार्यवाह स्नेहल रानडे मॅडम, खजिनदार विठ्ठल कदम,  नंदिनी टाले मॅडम- शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवी गीता वालावलकर मॅडम- ननिरीक्षक स्वभावाचे, काशिनाथ उंडे- जीवन संगीतमय करणारे शध दिगंबर कुलकर्णी- कार्यक्षम व्यवस्थापक. लक्ष्मीकांतजी कुलकर्णी- या सर्वांना बरोबर घेऊन अत्यंत यशस्वी वाटचाल करणारे- नम्र स्वभावाचे-

अभ्यासू- माजी अध्यक्ष सुधाकरजी रेम्बोटकर आणि नियोजन समिती अध्यक्ष विठ्ठलरावजी कांबळे या सर्वांच्या अथक आणि अविरत समर्पणातून हा वर्धापन दिन केवळ आनंददायी नव्हे तर -संकल्प सिद्धीस नेणारा ठरला. विठ्ठलराव कांबळेंनी लकी ड्रॉच्या- माध्यमातून या समारंभाला एक वेगळीच शोभा आणली. खजिनदार विठ्ठलराव कदम यांनी संस्थेच्या खजिन्याची काळजी घेता घेता समारंभाच्या प्रत्येक विभागात आपली जबाबदारी यथाशक्ती पारपाडली.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे– आपल्या मंडळाचे- निष्काम कर्मयोगी  अध्यक्ष  अशोक काळोखे यांनी खास करून– उत्कृष्ट मंडप व्यवस्था स्वादिष्ट भोजन व्यवस्था वेळेचे नियोजन! मान्यवरांना वेळेवर सन्मानपूर्वक आमंत्रण देणे. वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या अनुभव संपन्नतेतून प्रबोधन करणारे व्याख्याते  ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर विनोद शहा यांच्या निवडीस संमती देणे.

या सर्व जबाबदाऱ्या एखाद्या वधु पित्याच्या भूमिकेतून त्यांनी संपन्न केल्यात! काका- काकी मामा- मामी या विविध भूमिकेतून – कार्यकारणीच्या सर्व सभासदांनी आपआपली कर्तव्ये वेळोवेळी निभावलीत. म्हणून ही सर्व मंडळी कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!