मावळसामाजिक

श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाचे वतीने तळेगावात Advocate दादासाहेब तथा पु.वां. परांजपे व्याख्यानमाला संपन्न.

Spread the love

श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाचे वतीने तळेगावात Advocate दादासाहेब तथा पु.वां. परांजपे व्याख्यानमाला संपन्न.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १६ जानेवारी.

श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालयाचे वतीने तळेगावात Advocate दादासाहेब तथा पु.वां. परांजपे व्याख्यानमाला सन 2023.24 अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. काल सायंकाळी सदर व्याख्यानमाला  संपन्न झाली.

व्याख्यानाचे सुरुवातीला छत्रपती सेवा प्रतिष्ठान पुणे व गणेश मोफत वाचनालयाचे निमित्ताने मा. जिजाऊ साहेबांच्या स्मृतीदिनाच्या 350 व्यां वर्षानिमित्त, लेखक व शिवकथाकार. विजयरावजी देशमुख यांनी लिहिलेल्या शककर्ते शिवराय या 5व्या खंडाच्या शिव आवृत्ती चे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर, रामकथाकार, श्रीमती सुनंदाताई जोशी ( पश्चिम क्षेत्र कार्यवाही का राष्ट्रसेविका समिती) यांचे सामाजिक जीवनातील राम या विषयावर व्याख्यान झाले.

सुनंदाताई जोशी यांनी रामायणातील सामाजिक जीवन व सध्याचे सामाजिक जीवनावर वेगवेगळी उदाहरणे/ दृष्टांत देऊन सर्व श्रोतेवर्गाला जागेवर खिळवून ठेवले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!