लोणावळासामाजिक

भारत योगा माला या उपक्रमाचे अॕडमिरल आर. हरी कुमार यांचे हस्ते उद्घाटन..

लोणावळ्यातील कैवल्यधाम च्या शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम.

Spread the love

भारत योगा माला या उपक्रमाचे अॕडमिरल आर.हरी कुमार यांचे हस्ते उद्घाटन ; लोणावळ्यातील कैवल्यधाम च्या शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम.

आवाज न्यूज  :  मच्छिंद्र मांडेकर  लोणावळा प्रतिनिधी,१७ जानेवारी.

भारत योगा माला या उपक्रमाचे  अॕडमिरल आर.हरी कुमार यांचे हस्ते उद्घाटन एका शानदार कार्यक्रमात करण्यात आले. लोणावळ्यातील कैवल्यधाम च्या शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेच्यावतीने जाहीर करण्यात आले.
लोणावळा येथे १९२४ मधे स्वामी कुवल्यानंदजी यांनी कैवल्यधाम योग संस्थेची स्थापना केली.
संस्था आपले शताब्दी वर्ष साजरे करीत असून आॕक्टोबर २०२४ मधे शतकपूर्ती करीत आहे. त्यानिमित्त याचे औचित्य साधून कैवल्यधाम योग संस्था, लोणावळा येथे मंगळवार ता.१६ जानेवारी रोजी ” भारत योग माला ” या अभियानचे उद्घाटन भारतीय नौदलाचे अॕडमिरल आर.हरी कुमार ( पीव्हीएसएम,एव्हीएसएम,, व्हीएसएम,एडीसी ),चिफ आॕफ नेवल स्टाफ ) यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश तिवारी, संस्थेचे मानद सचिव, व प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी , संयुक्त संशोधन संचालक डाॕ.रणजितसिंह भोगल ,सैन्यदलांचे निवृत्त ब्रिगेडियर.सुहास धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन आणि भारत योगा माला या अभियान फलकाचे अनावरणाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी छञपती शिवाजी महाराज यांच्या शिवमुद्रेचे आकाराचे मानचिन्ह प्रमुख पाहुण्यांना प्रदान करण्यात आले , तसेच शाल , पुष्पगुच्छ देवून व कैवल्यधाम संस्थेच्या शताब्दीनिमित्त ( १९२४-२०२४ ) प्रकाशित झालेले शंभर रूपयांची मुद्रिका देवून अॕडमिरल आर. हरीकुमार यांचा सन्मान करण्यात आला.नौदलाचे वतीने कैवल्यधाम संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डाॕ.ओमप्रकाश तिवारी यांना नौदलातर्फे अँकर हे बोधचिन्ह अॕडमिरल आर.हरी कुमार (पीव्हीएसएम,एव्हीएसएम,, व्हीएसएम,एडीसी ) यांचेकडून प्रदान करण्यात आले. तसेच शाल व मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी कैवल्यधाम संस्थेच्या व्हिडिओ थीम साँग चे कार्यक्रमात प्रसारण करण्यात आले.
याप्रसंगी कैवल्यधाम संस्थेचा आधिकारी वर्ग, योग महाविद्यालयातील विद्यार्थी, कैवल्य विद्या निकेतनमधील शिक्षक वर्ग, लोणावळ्यातील मान्यवर व्यक्ती, लोणावळा शहरातील पञकार उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात योगा मधील शांतीपठनाने करण्यात आली. ‘ भारत योग माला ‘ या अभियानाचे उद्घाटन नौदलाचे अॕडमिरल आर.हरीकुमार यांचे हस्ते करण्यात आले. यानिमित्त अॕडमिरल आर.हरीकुमार यांच्या हस्ते ‘ भारत योगा माला , या अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत योगव्दारे मानसिक आणि शारिरीक उन्नती यावर प्रकाशमान टाकणारी चर्चा आणि सराव यांचे आयोजन करण्यात आले.यावेळी नौदलाचे अॕडमिरल आर.हरीकुमार यांचे उद्घाटनपर भाषण झाले.

त्यांनी मनुष्यासाठी योग जीवनात किती उपयोगी व महत्वाचा व्यायाम प्रकार आहे, याचे महत्व पटवून देत कैवल्यधाम संस्था गेली शंभर वर्षे हे कार्य करत असल्याचे सांगून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. संस्थेला शताब्दीनिमित्त शुभेच्छा दिल्या.या अभियानाद्वारे योगाचा प्रचार व प्रसार संपूर्ण देशभर होईल , असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.अॕडमिरल आर.हरीकुमार पुढे म्हणाले ” योगाचे नियमित सरावाने जीवनात सद्बुध्दी,  विवेक, वैराग्य, चित्तवृत्ती निरोधा, समाधान, सौख्य, योगवृत्ती प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण यांनी आर्जूनाला युध्द का करायचे याबाबत उपदेश करताना मोलाचे विचार व्यक्त भग्वदगीतेमधे मांडलेला आहे, असे सांगितले.

कार्यक्रमास योगदान : कैवल्यधाम योग संस्था -लोणावळा व आयुष मंञालय , भारत सरकार , नवी दिल्ली , यांच्या संयुक्त विद्यमाने ” भारत योगा माला ” या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत भारतातील विविध प्रमुख शहरात मुंबई, कलकत्ता, कोचीन, चेन्नई, विशाखापट्टन, आदी प्रमुख शहरांमधे योग कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. सेंट्रल बँक आॕफ इंडिया, द्वारा ” भारत योग माला ‘ अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, नवी दिल्ली आणि प्रोजेक्ट लाईफ, राजकोट यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. यावेळी कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव व कार्यकारी आधिकारी सुबोध तिवारी यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वर्षभराचे अभियानची माहिती दिली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली.

सूञसंचालन योग शिक्षिका श्रीमती ममता विष्ट यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!