आरोग्य व शिक्षणमावळसामाजिक

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित “वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा”.

Spread the love

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित “वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा”.Pune Rural District Police organized “Heritage of Cleanliness, Mawla Shivaraya”.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, १७ जानेवारी.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक. अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक. मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून “वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा” हे गड किल्ले स्वच्छता अभियान माहे एप्रिल 2023 पासून चालू करण्यात आले आहे.

२६ एप्रिल २०२३ रोजी कार्ला ता.मावळ जि पुणे येथील ऐतिहासिक एकविरा गड व बौद्ध कालीन लेण्यांची स्वछता करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, NCC कॅडेड, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वकील, पत्रकार, पोलीस पाटील व नागरिकांनी सहभागी होते या अभियानास नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

या अभियानामध्ये किल्ले लोहगड, तसेच पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे लोणावळ्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेले टायगर पॉईंट, भुशी डॅम व किल्ले तिकोना या ठिकाणाची स्वछता करण्यात आली.
या स्वच्छता अभियानात १२ टन कचऱ्याचे संकलन करून हा कचरा लोणावळा नगरपरिषदेच्या कचरा प्रक्रिया केंद्रास सुपूर्त करण्यात आला होता.

असा प्रकारे या अभियानाच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, दारूच्या रिकाम्या काचेच्या बाटल्या व इतर कचरा संकलित करण्यात आला.
या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये विविध विषयावर जागृती करण्यासाठी स्वछता अभियान संपल्यानंतर उपस्थितांना पथनाट्य किंवा तज्ञ व्यक्तींच्या मार्फतीने व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा, महिला सुरक्षा, वाहतूक नियमन या सारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करून जनजागृती केली जाते.

*या स्वछता अभियानाच्या दुसऱ्या पर्वा ची सुरुवात दि.२० जानेवारी २०२४ रोजी सकाळी 06:30 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सर्व महापुरुषांचे पुतळे व परिसराची स्वछता तसेच सोमनाथ महादेव मंदिर नांगरगाव, लोणावळा येथील इंद्रायणी नदी पत्रातील जलपर्णी* काढून अध्यात्मिक नदी इंद्रायणी नदीची स्वछता करून करण्यात येणार असल्याचे अभियानाचे संकल्पक श्री सत्यसाई कार्तिक सहा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.
या स्वछता अभियानात स्वयंसेवकांचे दोन समूह तयार करून खालील ठिकाणी अभियान राबविण्यात येणार आहे.

१) छ. शिवाजी महाराज चौक, लोणावळा,२) सोमनाथ महादेव मंदिरा जवळील इंद्रायणी नदी पात्र

या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करून स्वछता अभियाना साठी शनिवार दि.२०/१/२०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता “छ. शिवाजी महाराज” चौक लोणावळा ता मावळ जि पुणे येथे एकत्रित जमावे असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!