Puneमावळसामाजिक

श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त,श्रीराम मंदिर, दाभाडे आळी, पहाटे ५ वाजता अखंड श्रीराम धुन प्रभात फेरीचे आयोजन.

सर्व तळेगांवकर भाविकांनी सहभागी व्हावे ही  विनंती करण्यात येत आहे.

Spread the love

श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त,श्रीराम मंदिर, दाभाडे आळी, पहाटे ५ वाजता अखंड श्रीराम धुन प्रभात फेरीचे आयोजन.On the occasion of Shri Ram installation ceremony, Shri Ram Temple, Dabhade Ali, organized Akhand Shri Ram Dhun Prabhat Feri at 5 am.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १८ जानेवारी.

श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होत असुन, सर्व तळेगांवकर भाविक बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की, आपल्याला विधीत आहेच की ५०० वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची अयोध्ये मध्ये आपल्या जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्ताने आपल्या तळेगांव मध्ये आपण पौष शुद्ध १२, शके १९४५, सोमवार, दि. २२/०१/२०२४ श्रीराम मंदिर, दाभाडे आळी, पहाटे ५ वाजता अखंड श्रीराम धुन प्रभात फेरीमोठया उत्साहात भक्तीपूर्ण वातावरणात फक्त टाळ-मृदंग व सनई-चौघडा या मंगल वाद्यासह ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। या महामंत्रोच्चारात प्रभात फेरी काढणार आहोत, त्यात सर्व तळेगांवकर भाविकांनी सहभागी व्हावे ही  विनंती करण्यात येत आहे.

परिक्रमा मार्ग

दाभाडे आळी श्री राम मंदिर श्री डोळसनाथ महाराज मंदिर राजवाडा गणपती चौक बाजारपेठ -तेली आळी मारुती मंदिर – जिजामाता चौक सुभाष चौक शाळा चौक श्री विठ्ठल मंदिर.

सकाळी ७.३० वा. श्री विठ्ठल मंदिर. शाळा चौक येथे सांगता व महाआरती होईल, अशी माहिती श्री विठ्ठल मंदिर संस्थान, नित्योपचार समिती तळेगांव दाभाडे यांच्या कडून आवाज न्यूज प्रतिनिधींना देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!