आरोग्य व शिक्षण

पिंपरी चिंचवड महापौरांवर पवना नदीचे जलपूजन रद्द करण्याची नामुष्की : शिवसेनेच्या वतीने आंदोलन

Spread the love

चिंचवड : पिंपरी – चिंचवडच्या महापौरांवर पवना जलपुजन रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. दरवर्षीप्रमाणे पवना जल पूजनासाठी पिंपरी- चिंचवडच्या महापौर माई ढोरे आज पवना धरणावर येणार होत्या. मात्र शिवसेनेने कडाडून विरोध करत इशारा दिल्याने महापौरांनी जलपूजन कार्यक्रम रद्द केला.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवना जलपूजन चार दिवसांपूर्वी पार पडले. यावर महानगरपालिका भाजपा सभागृहनेते नामदेव ढाके यांनी जल पूजनाचा हक्क महापौरांचा आहे. खासदार स्टंटबाजी करत असल्याचे वादग्रस्त विधान केले. यामुळे महापौरांच्या जलपूजन कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला तसेच आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सकाळी 7 पासून शिवसैनिक झेंडे घेऊन पवना धरणावर जमले होते. पवना धरणग्रस्त समितीचे सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या सर्व परिस्थितीमुळे महापौरांनी जलपूजन रद्द केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर,संघटक अंकुश देशमुख, सुरेश गायकवाड, तालुका उपप्रमुख अमित कुंभार,आशिष ठोंबरे, चंद्रकांत भोते मदन शेडगे समन्वयक ,रमेश जाधव महिला जिल्हाध्यक्ष शैला खंडागळे, तालुका संघटिका अनिता गोणते विभाग प्रमुख किसन तरस राम सावंत, उमेश दहीभात , लोणावळा शहर प्रमूक बाळासाहेब फाटक,देहू शहर प्रमूख सुनील हगवणे देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू तळेगाव शहर प्रमूख दत्ता भेगडे देव खरटमल सिध्द नलवडे , सतीश इंगवले,युवा अधिकारी श्याम सुतार, तळेगाव महिला आघाडी संघटीका रुपाली आहेर सुनंदाताई आवळे सुरेखाताई मोरे सुनंदाताई डमाले मंगलताई लगाडे अंजली शिर्के सुरेखाताई केदारी ग्रा .प सदस्य उषाताई इंगवले मा .सरपंच अनिल भालेराव , शहर शाखा प्रमूख सुरेश गुप्ता,सचिन कलेकर, विकास कलेकर, किशोर शिर्के, अंकूश वागमारे, उमेश ठाकर,पोपट राक्षे, युवराज सुतार,धरणग्रस्त चे नेते रविकांत रसाळ,मुकुंद कौर,किसन घरडाले, शंकर दळवी,छबन काळे, बाजीराव शिंदे, छाया काळेकर, लिलाबाई डोंगरे, राम काळेकर,सरपंच सुनील येवले,आकाश वाळुंज, ,इत्यादी सर्व शिवसेना महिला आघाडी युवा सेना व भा .वि .से .युवती सेना चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!