नगरपरिषदमावळसामाजिक

दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यात मुख्याधिकारी अकार्यक्षम. समीर गुंजाळ

Spread the love

दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यात मुख्याधिकारी अकार्यक्षम.
समीर गुंजाळ.Principal inefficient in solving the problems of the disabled.Sameer Gunjal.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, ११ ऑक्टोबर.

 

तळेगाव शहरातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवण्यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील अकार्यक्षम असल्याचे मत दिव्यांग संस्थेचे सदस्य समीर गुंजाळ यांनी व्यक्त केले आहे. दिव्यांग बांधवांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसून दिव्यांग बांधवांची अनुदाना वाचून आर्थिक चनचन उद्भभवत आहे.दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे तसेच औषध उपचार व घर खर्चालाही पैसे उरत नसल्याचे मत समीर गुंजाळ यांनी व्यक्त केले आहे.

सदर सर्व अडचणी सुमारे तीन महिन्यापूर्वी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांना समक्ष भेटून सांगितले असता मुख्याधिकारी दिव्यांग बांधवांचे प्रश्न गांभीर्यपूर्वक घेत नसल्याचे दिसून आले आहे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. किशोर भाऊ आवारे यांनी दिव्यांग बांधवांना दरमहा 3000 रुपये अनुदान मिळण्यासाठी तरतूद केली होती त्याकाळी मुख्याधिकारी म्हणून विजयकुमार सरनाईक कार्यरत होते परंतु दोनच महिने 3000 रुपयांनी अनुदान मिळाले व पुन्हा सदर अनुदान हे विद्यमान मुख्याधिकारी एन के पाटील यांनी कमी केले आहे.

सदर कमी करण्यात आलेल्या अनुदान हे पुरेसं नसून पुन्हा तीन हजार रुपये अनुदान मिळावे अशी मागणी समीर गुंजाळ यांनी केली आहे. दिव्यांगाच्या प्रश्नाबद्दल मुख्याधिकारी गांभीर्यपूर्वक प्रश्न सोडवणार नसतील तर सदर मुख्याधिकाऱ्यांची त्वरित बदली करून सक्षम मुख्याधिकारी नेमावा असा अर्ज समीर गुंजाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!