आरोग्य व शिक्षण

कैलाश खेर फाउंडेशनच्या वतीने लोणावळा खंडाळामधील गरजूंना अन्नधान्य व कोरोनील किट वाटप

Spread the love

लोणावळा : कैलाश खेर फाउंडेशनच्यावतीने लोणावळा खंडाळातील गरजू नागरिकांना अन्यधान्य , कोरोनिल किट आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात खंडाळा येथील वनखात्याच्या विश्रामगृहात वृक्षारोपनाने करण्यात आली. यानंतर कैलाश खेर फाऊंडेशनच्या  अन्सारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर त्यांचे हस्ते व शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे , कुरवंडे च्या वनरक्षक नागरिकांना किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मच्छिंद्र खराडे, वनिता राठोड, वनमजूर ठोंबरे , खंडाळाचे प्रभारी मुकादम दीपक शिंदे , सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड , दत्ता दळवी , ओमकार खराडे, सचिन वाळके , श्याम बाबू वाल्मिकी , चिराग खराडे , राजू इरले , भरत धुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!