आरोग्य व शिक्षण

जनसेवा विकास समितीच्या दणक्यानंतर दिव्यांगांना मिळाले थकीत अनुदान

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर 24 तासात अनुदान खात्यात जमा

Spread the love

तळेगाव : जनसेवा विकास समितीने दिव्यांगांचे थकीत अनुदान त्वरित मिळावे यासाठी ठिय्या आंदोलन पुकारले होते. मात्र केवळ या आंदोलनाच्या इशा-रानंतर खडबडून जागे होत नगरपरिषदेच्या वतीने दिव्यांगांचे थकीत अनुदान त्यांच्या खात्यात 24 तासात जमा करण्यात आले.

शहरातील 342 दिव्यांगांचे गेले तीन महिन्यापासून प्रतिमाह 3000 हजार रुपये अनुदान थकीत होते. समितीच्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दिव्यांगांना अनुदान मिळावे या मागणीसाठी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले होते. समितीच्या या इशाऱ्यानंतर नगर परिषदेने कालच 342 दिव्यांगांचे 20,28,000 हजार रुपयांचे अनुदान चेकद्वारे जमा केले. यामुळे जनसेवा विकास समितीने आजचे आंदोलन स्थगित केले.

यापुढे दिव्यांगांना अनुदानासाठी नगरपरिषदेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्यांचे अनुदान थकीत राहणार नाही या नगरपरिषदेच्या व प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केल्याची माहिती जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिली.

यावेळी बोलताना आवारे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून दिव्यांग बांधव अनुदानासाठी नगरपरिषदेत फेऱ्या मारत होते. मात्र त्यांना दरवेळी वेगवेगळी कारणे सांगितली जात होती. त्यामुळे आम्ही आंदोलन पुकारले होते. मात्र आमच्या आंदोलनाच्या इशा-रानंतर रात्रीतून चक्र हलली व दिव्यांगांचे थकीत अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले.

यावेळी दिव्यांग विकास संस्थेचे उपाध्यक्ष गणेश किल्लारी म्हणाले, जनसेवा विकास समितीने आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले. तीन महिन्यांपासून आमचे अनुदान रखडले होते. सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीमध्ये अनुदान रखडने ही आमच्यासाठी खेदाची बाब होती. कोरोनामुळे काहींचे रोजगार थांबले आहे. स्वयंरोजगारासाठी वाव नाही. तर काहींचा उदरनिर्वाहाच या अनुदानावर होतो. अनुदान रखडल्यामुळे अनेक दिव्यांगांची कुचंबना झाली. जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात भेटल्यानंतर त्यांनी दखल घेत केवळ एका दिवसात पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून दिला.

यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, मा.नगराध्यक्ष व नगरसेविका सुलोचना आवारे, विरोधी पक्षनेते गणेश काकडे, नगरसेवक निखिल भगत, रोहित लांघे, समीर खांडगे, मा. नगरसेवक सुनील कारंडे, प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत, चिराग खांडगे, दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष किशोर दिघे, उपाध्यक्ष गणेश खिल्लारे, सचिव पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!