आरोग्य व शिक्षण

शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी आणलेला हा पीएमआरडीए आराखडा रद्द झालाच पाहिजे – भाई भरत मोरे

Spread the love

लोणावळा : शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासाठी आणलेला हा पीएमआरडीए आराखडा रद्द झालाच पाहिजे . चांगला विकास होण्यासाठी धनदांडग्यांच्या दोनशे , शंभर एकर जमिनी दिसत नाहीत ,फक्त तीन एक , दोन एकर असे आल्पभूधारक शेतकरी भुमिहीन झाला ;तर वीस वर्षे जगेल का ? असा संतप्त प्रश्न श्री एकविरा कृती समितीचे अध्यक्ष व माजी जिल्हापरिषद सदस्य भाई भरत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

श्री एकविरा कृती समितीच्या वतीने पीएमआरडीए च्या चुकीच्या आराखड्याविरोधात आज पंधरा ते वीस मिनिटे कार्लाफाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी मोरे बोलत होते.

सकाळी दहा वा.दहा मिनिटांनी रास्तारोको आंदोलन सुरू झाले. यावेळी एकविरा कृती समितीचा विजय आसो ! शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो ! खोल करा खोल करा नदीपाञ खोल करा.! शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ! चुकीचे वनीकरण झोन रद्द झालैच पाहिजे ! बांधकाम केलेल्या घरावरून व शेतातून केलेले आरक्षण रद्द झालेच पाहिजे , आशा घोषणा शेतकऱ्यांनी देत महामार्गावर ठिय्या मांडला.

कार्ला फाटा येथे लोणावळा ग्रामिणचे , शहर , व मुख्यालयाचे २० असे सुमारे शंभर पोलिसांकडून पोलिस निरिक्षक प्रविण मोरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी भाई भरत मोरे , माजी पंचायत समिती सभापती व पीएमआरडीएचे सदस्य शरद हुलावळे , राष्ट्रवादी चे तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे , माजी सरपंच नंदकुमार पदमुले ,तसेच बाळासाहेब भानुसघरे , सुरेश गायकवाड , राजूभाऊ देवकर , कार्लाचे उपसरपंच किरण हुलावळे आदींच्या हस्ते निवेदन पीएमआरडीएचे आधिकारी चव्हाण यांना देण्यात आले.

यावेळी एकविरा कृती समितीचे अध्यक्ष मोरे म्हणाले , ” पीएमआरडीएने धनदांडग्यांच्या शे – दोनशे एकर जमिनीवर आरक्षण टाकले नाही ,तर दोन- तीन एकरवाले अल्पभुधारक शेतकरी यांना शेतात रस्ता टाकून भूमिहीन करण्याचा डाव आहे. मावळात लहान मोठे व्यवसाय करण्यासाठी असलेला आर झोन काढून शेतीझोन व वनझोन टाकल्याने तो उध्वस्त होईल. स्थानिक स्वराज्य जि.प.पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास होईल , मग पीएमआरडीएची गरज काय ! तो रद्द केलाच पाहिजे ! नदीपाञ टाटाचे कडून खोल करून घेवून लोणावळ्यातील तीस मीटरवर पूररेषा होण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रयत्न करावे , असे .मोरे म्हणाले .

माजी सभापती शरद हुलावळे भाषणात म्हणाले , आमचा पीएमआरडीएला विरोध राहील. वलवण ते पाथरगाव नदीतील गाळ काढून पूररेषा कमी करावी. शेतातून रस्ता नेला तर अल्पभुधारक शेतकरी भूमिहीन होईल वनीकरण व रेडझोन रद्द होऊन ग्रीन झोनऐवजी आरझोन झाला पाहिजे ,नाहीतर वीस वर्षे शेतकरी जगणार कसा ? मावळचे खासदार व आमदार यामधे सदस्य आसून ते न्याय देतील ,आसा विश्वास आहे .

यावेळी सचिव संघटना आध्यक्ष गणपत भानुसघरे , कार्लाचे माजी उपसरपंच कैलास हुलावळे , पाटणचे माजी सरपंच गुलाब तिकोणे , वेहेरगाव येथील व्यापारी संघाचे आध्यक्ष संजय देवकर , वरसोली चे माजी सरपंच संजय खांडेभरड, बोरजचे माजी चेअरमन सुरेश केदारी , मळवली चे माजी उपसरपंच तुकाराम ठोसर, पाथरगाव चे माजी सरपंच अमोल केदारी , औंढोली चे शेतकरी चंद्रकांत मांडेकर , आनिल कडू, कुरवंडे चे शेतकरी सुरेश कडू , वाकसई चे माजी सरपंच मारूती देशमुख , देवल्याचे माजी सरपंच एकनाथ आंबेकर , सरपंच महेंद्र आंबेकर , दहिवलीचे माजी सदस्य शहाजी पडवळ , वाकसई चे शेतकरी बाळासाहेब येवले , सदापूरचे शेतकरी दत्ताञेय ढाकोळ, देवलेतील , भाजे, औंढे , औंढोली , शिलाटणे ,पाटण बोरज अशा प्रत्येक गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सूञसंचालन उपसरपंच किरण हुलावळे , मनोगत व स्वागत माजी सरपंच तानाजी पडवळ यांनी केले ,आभार वेहेरगावचे सदस्य राजूशेठ देवकर यांनी मानले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!