आरोग्य व शिक्षण

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2 यांच्या वतीने पोलिसांना ५०० किलो चिक्की चे वाटप

Spread the love

तळेगाव दाभाडे : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2 यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून केल्या जाणाऱ्या विशेष कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुमारे ५०० किलो चिक्की चे वाटप करण्यात आले.

स्वारगेट येथे पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, प्रांतपाल पी.डी.जी. रमेश शहा, श्री. फत्तेचंदजी रांका, श्री. दिपक कुले तसेच अन्य लायन्स क्लबचे प्रेसिडेंट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमा अंतर्गत लायन्स क्लबच्या वतीने विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना चिक्की चे वाटप करण्यात आले.
या अंतर्गत,लायन्स क्लब पुणे गॅलेक्सी च्या प्रेसिडेंट मंदाकिनी माळवदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  पुणे येथील लष्कर विभाग इ-स्ट्रिट, आणि तळेगांव दाभाडे येथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून चिक्की चे वाटप केले. याप्रसंगी तळेगावातील श्री. सम्राट काशीकर, श्री दिलीप डोळस, श्री. राजेश बारणे आदी मन्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!