आरोग्य व शिक्षण

कोकण विकास महासंघच्या वतीने ताम्हिणी घाटातील धोकादायक खड्डे बुजविले

Spread the love
आवाज न्यूज : कोकण विकास महासंघ पिंपरी चिंचवड, पुणे चे संस्थापक/अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ताम्हिणी घाटातील धोकादायक खड्डे बुजवण्यात आले.

समस्त कोकण वासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं सण म्हणजे गणेश उत्सव. गणेश उत्सव दोन दिवसांवर आला तरी पुण्याहून कोकणात जाणारा एकही रस्ता हा वाहतुकीसाठी योग्य नाही सर्व घाट रस्ते खड्डेमय झाले आहेत . कोकण विकास महासंघ च्या वतीने वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही त्यामुळे आज दिनांक ०८ सप्टेंबर २०२१ रोजी कोकण विकास महासंघाचे संस्थापक/अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ताम्हिणी घाटातील अत्यंत धोकादायक वळणावरील खड्डे कोकण विकास महासंघाच्या स्वयं सेवकांच्या वतीने भरण्यात आले. यावेळी डोंगरवाडी, आदर वाडी, ताम्हिणी गावातील नागरिक तसेच शिवकार्य प्रतिष्ठान चे कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी या मार्गाहून जाणाऱ्या कोकण वासियांनी कोकण विकास महासंघाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल आभार मानले.

या उपक्रमासाठी माजी नगरसेवक सद्गुरू कदम , राजेश दळवी, संजय मोरे, अभिषेक शिंदे, निलेश कदम , किरण यादव, अमृत जाधव , विलास बर्वे , रोहन शिंदे, अमोल पाटील, नवनाथ नाईकनवरे, विकास खरात, राजू पातोंड तसेच शिवकार्य प्रतिष्ठानचे जयवंत चोरगे, लक्ष्मण कोढेकर, राजेश निवेकर, सुनील गाऊडसे (सरपंच निवे), शंकर मराठे (तंटामुक्ती कमिटी अध्यक्ष निवे), नंदू शिंदे(उपसरपंच निवे), संदीप बामगुडे(मा.सरपंच ताम्हिणी), यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रा संदिप कदम यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!