क्रीडा व मनोरंजनमावळ

इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने जागतिक सुक्ष्मजीव दिन साजरा

विद्यार्थ्यांच्या मागणी खातर इंद्रायणी महाविद्यालयात लवकरच पदवीत्तर पदवी (M.Sc Microbiology) अभ्यासक्रम सुरु करणार.. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे .

Spread the love

इंद्रायणी महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने जागतिक सुक्ष्मजीव दिन साजरा ; विद्यार्थ्यांच्या मागणी खातर इंद्रायणी महाविद्यालयात लवकरच पदवीत्तर पदवी (M.Sc Microbiology) अभ्यासक्रम सुरु करणार.. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २० सप्टेंबर.

इंद्रायणी महाविद्यालयाच्या वरिष्ठ विज्ञान विभागाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी जागतिक सुक्ष्मजीव दिन साजरा करण्यात आला. सुक्ष्मजीवशास्त्र विषयाचा मागोवा घेत प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी सुक्ष्मजीवांचे मानवी जीवनात असलेले महत्व सांगितले.तसेच करोना काळात सुक्ष्मजीव शास्त्रज्ञांनी किती महत्वाची भुमिका बजावली याबद्दल जाणीव करुन दिली.

सुक्ष्मजीव शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना संशोधन व औद्योगिक क्षेत्रातील संधीबाबत बोलत असताना विद्यार्थ्यांच्या मागणी खातर इंद्रायणी महाविद्यालयात लवकरच या विषयामधे पदवीत्तर पदवी (M.Sc Microbiology) अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे सांगितले. सर्वानी टाळ्याच्या गजरात या विषयाचे स्वागत केले.

या कार्यक्रमात तृतीय वर्षामधे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी प्रयोगशाळेतील संशोधन उपकरणे व विविध प्रकारचे जीवाणू यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनामधे सुक्ष्मदर्शीकेच्या व पोस्टरच्या माध्यमातुन कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना माहीती देऊन सुक्ष्मजीवशास्त्र क्षेत्रात असलेल्या करीअरच्या संधीबद्दल माहिती देण्यात आली.

 

यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी सुक्ष्मजीवाच्या अदृश जगाचा अनुभव घेतला. यामधे एकूण ३०० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला. सुक्ष्मजीव शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका विद्या पाईकराव यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व जागतिक सुक्ष्मजीव दिनाची माहिती दिली. विज्ञान विभाग प्रमुख प्रा.रोहित नागलगाव यानी सर्वांचे स्वागत केले.

प्रा. राखी चौडणकर यानी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व संचालिका निरुपा कानिटकर यानी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!