आरोग्य व शिक्षण

तळेगाव चाकण महामार्गावर खड्डे खोदून ठेवणाऱ्या ठेकेदाराला अटक

आवाज न्यूजच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

तळेगाव : येथे तळेगाव – चाकण महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आवाज न्यूजने याबाबत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ‘तळेगाव चाकण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी खोदलेल्या साईटपट्ट्या बनल्यात अपघाताचे सापळे’ या मथळ्याखाली 10 सप्टेंबर रोजी आवाज न्यूजने बातमी प्रसारित केली होती.

सदर काम दीड महिन्यापासून बंद असून खोदून ठेवलेल्या साईट पट्ट्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांना संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याने पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी ही कारवाई केली आहे.

ठेकेदाराच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत ठेकेदारावर कारवाई करण्यात आली. या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांना संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!