आरोग्य व शिक्षण

कोरोनाबरोबर डेंग्यु ,मलेरिया जनजागृती अभियान राबविण्यासाठी निवेदन

Spread the love

कार्ला : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत असला तरी हवामानातील बदलामुळे डेंग्यु ,मलेरिया या साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.यासाठी संपुर्ण कार्ला गावात जनजागृती अभियान राबवुन नागरीकांनमध्ये जनजागृती करावी असे निवेदन कार्ला ग्रामपंचायतीचा सदस्या वत्सला संजय हुलावळे,सोनाली सतीश मोरे,ग्रामपंचायत सदस्य व कार्ला शिवसेना शाखा प्रमुख सचिन किसन हुलावळे,सदस्य सनी भरत हुलावळे यांचा वतीने कार्ला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक  सुभाष धोञे व कार्ला जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी भारती पोळ यांना देण्यात आले.

तसेच यासंदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास संपर्क करावा असे आवाहन नागरीकांना करण्यात आले.यावेळी उपशाखा प्रमुख कुमार हुलावळे,मच्छिंद्र वायकर,अमर गुरव,अक्षय हुलावळे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!