आरोग्य व शिक्षण

कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर यांची इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या गोठ्याला भेट

मृत्युमूखी पडलेल्या जनावराला प्रत्येकी 15000 अनूदान

Spread the love

 

इंदापूर : पूणे जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाबुराव  वायकर यांनी इंदापूर तालुक्यातील डाळज नं.3 येथील शेतकरी पशुपालक गणेश जगताप,लालासो रामदास गलांडे व हणमंत गलांडे यांच्या गोठ्यावरील 25 गायी मृत्यूमुखी पडल्याने गोठ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी  शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी बद्दल त्यांचे सांत्वन केले.

गणेश जगताप यांच्या गोठ्यामधील 16 जर्शी गाई व लालासो रामदास गलांडे यांच्या 6 गाई आणि हनुमंत जगताप यांच्या 3 गाई 5 कालवड लाळखुरकूत व घटसर्प आजाराने मृत्युमुखी पडल्या.त्यांच्या पशुधनाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या योजनेमधून   मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जनावराला प्रत्येकी 15000 रुपये इतकी अनुदान पर रक्कम देण्यात येईल.तसेच इतर माध्यमातून जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी यावेळी पशुपालक यांना दिले.

संपूर्ण जिल्ह्यात लसींचा औषधांचा तुटवडा झाला होता. पण आता लस मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत.शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वायकर यांनी केले.

तसेच अश्या घटना घडण्या आधीच त्यावर कश्या पद्धतीने उपाययोजना करता येईल यावर जास्तीत जास्त जबाबदारीने लक्ष देऊन पशुपालकांना मदत करा अश्या सक्त सूचनाही संबंधित विभागाच्या डॉक्टरांना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हणमंत बंडगर,गणेश  कदम , पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!