आरोग्य व शिक्षण

एकदिवसीय महालसीकरण मोहिमेत आठ हजार जणांचे लसीकरण

Spread the love

 

तळेगाव : शहरात महालसीकरण मोहीम शुक्रवार (दिनांक 24) रोजी पार पडली. या मोहिमेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शहरातील 19 लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या  लसीकरणासाठी रांगा लागल्या  होत्या. या मोहिमेअंतर्गत आठ हजार नागरिकांनी लस घेतली.

आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या  लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व आरोग्य अधिकार्‍यांचे व कर्मचाऱ्यांचे, नगरसेवकांचे,आशा वर्कर्स यांचे आमदारांनी  आभार मानले.

लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसाठी तळेगाव स्टेशन परिसरात जनसेवा विकास समितीच्या वतीने तर इतरत्र लायन्स क्लब व अन्य संस्थांच्या वतीने चहापाण्याची व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!