आरोग्य व शिक्षण

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची नियोजित ऑनलाईन विशेष सभा रद्द

Spread the love

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेची मंगळवारी(दि.२८) बोलविण्यात आलेली नियोजित ऑन लाईन विशेष सभा भाजप नगरसेवकांच्या लेखी मागणीनुसार नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी रद्द केली. नगरसेवकांचे प्रभागातील विविध विकास कामांचे विषय, विषय पत्रिकेमध्ये समाविष्ट करुन पुढील सर्वसाधारण सभा बोलविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा जगनाडे यांनी आवाज न्यूजशी बोलताना सांगितले.

मंगळवारी(दि.२८) सकाळी ११.३०वाजता विशेष सभेस सुरुवात झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत सभेचे कामकाज रद्द करण्यात आले. तशी घोषणा नगराध्यक्षा जगनाडे यांनी केली.

या ऑनलाईन सभेस नगरध्यक्षा जगनाडे यांच्यासह विरोधी पक्षनेते गणेश काकडे, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका हेमलता खळदे उपस्थित होते. भाजपाच्या नगरसेवकांनी या सभेकडे पाठ फिरवली. सभेसाठी घेण्यात आलेल्या विषयांबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता तसेच नगरसेवकांचे विषय विषयपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत कोणतीही माहिती न देता मंगळवारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची होणारी ऑन लाईन सभा रद्द करावी, अशी मागणी
सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीनगराध्यक्षा जगनाडे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली होती.

नियोजित सभा रद्द करावी,नगरसेवकांचे प्रभागातील विविध विकास कामांचे विषय, विषय
पत्रिकेमध्ये समाविष्ट करुन पुढील सभा बोलविण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यातआली होती. ही मागणी चित्रा जगनाडे यांनी मान्य करून नगरसेवकांचे विषय, विषयपत्रिकेत समाविष्ट करून पुढील सभेचे आयोजन केले जाईल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!