अध्यात्मिकमावळसामाजिक

एलशद्दाई मेथॉडिस्ट चर्च तळेगाव दाभाडे येथील ख्रिस्ती बांधवानी ख्रिस्त जन्मोत्सवा निमित्त गरजू लोकांना केले ब्लॅंकेट्सचे वाटप.

Spread the love

एलशद्दाई मेथॉडिस्ट चर्च तळेगाव दाभाडे येथील ख्रिस्ती बांधवानी ख्रिस्त जन्मोत्सवा निमित्त गरजू लोकांना केले ब्लॅंकेट्सचे वाटप.Elshaddai Methodist Church Talegaon Dabhade Christian brotherhood distributed blankets to needy people on the occasion of Christ birth.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २३ डिसेंबर.

एलशद्दाई मेथॉडिस्ट चर्च तळेगाव दाभाडे ( गावविभाग ) येथील तरुणांनी एकत्रित येऊन ; जगाला शान्ति, आनंद व प्रेम देण्याचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गाचा अवलंबन करून तळेगाव येथील ख्रिस्ती बांधवानी ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करत असताना तळेगाव ते पुणे दरम्यान असणाऱ्या गरजू लोकांना सामाजिक बांधिलकी जपत आत्ताचे थंडगार वातावरणापासून पासून बचाव होण्यासाठी गरम उबदार ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले. आणि सर्वांना नाताळ व येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्यात आल्या.

कार्यक्रमासाठी चर्च मधील  सभासदांनी उपस्थिती दर्शविली व प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी ब्र.अनिल , ब्र. अभय, सि. आयरीन, प्रणाली, समेंथा,  लोरेन , अब्राहम, विक्टर, सैमूअल् , पीटर, जुलियस, शमुवेल, मार्क, प्रणिल, अंकित, मनन, प्रणव, ओलियन, स्तवन, केविन आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!