क्रीडा व मनोरंजनसामाजिक

कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांची विज्ञान प्रदर्शनास भेट.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी साकारले विविध प्रकल्प.

Spread the love

कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांची विज्ञान प्रदर्शनास भेट.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बालवैज्ञानिकांनी साकारले विविध प्रकल्प.Students of Kauthali school visit science exhibition.Various projects carried out by child scientists in taluka level science exhibition.

आवाज न्यूज : प्रतिनिधी श्रावणी कामत, २२ डिसेंबर

दिनांक २१ डिसेंबर रोजी केतकेश्वर विद्यालय निमगाव या ठिकाणी ५१ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.कौठळी शाळेतील इयत्ता ३ री व ४ थी तील विद्यार्थ्यांना आज प्रदर्शन पाहण्यासाठी केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे आणले होते.लहान विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी आणण्याचा हेतू त्यांची जिज्ञासुवृत्ती,वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणे,कल्पकता, संशोधनात्मक वृत्ती,पडताळून पाहण्याची वृत्ती वाढावी हा होता.

विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी असणारे शेतीविषयक, आरोग्य, जीवन,दळणवळण, वाहतूक,संगणकावर आधारित प्रयोग पाहिले.प्रयोग सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले.त्यांना अनेक प्रयोग आवडले.शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी मुख्याध्यापक भारत ननवरे,उपशिक्षक अमित भोंग,आरती गायकवाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!