आंदोलनलोणावळा

लोणावळा शहरात सखल मराठा समाजातर्फे १०व्या दिवशी वलवण ग्रामस्थांचे उपोषण

औंढेखुर्द , औंढोलीत २१ वा दिवस गाणी अभंगाचा गजर ..

Spread the love

लोणावळा शहरात सखल मराठा समाजातर्फे १०व्या दिवशी वलवण ग्रामस्थांचे उपोषण, औंढेखुर्द , औंढोलीत २१ वा दिवस गाणी अभंगाचा गजर ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २२ डिसेंबर.

लोणावळा शहरात सखल मराठा समाजातर्फे १०व्या दिवशी वलवण ग्रामस्थांचे उपोषण सुरू मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है ! छञपती शिवाजी महाराज की जय,  आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाचे बाप्पाचे आदी घोषणाबाजीने छञपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला.

औंढेखुर्द , औंढोलीत २१ वा दिवस गाणी अभंगाचा गजर महिला भगिनींनी केला. वारकरी महिलांनी दिंडीत म्हणावीत अशी गाणी, अभंग गायले.मरोज जरांगे पाटील यांचे उपोषणाला बळ व पाठिंबा देण्यासाठी ता.१ डिसेंबर पासून काही ठिकाणी ता.२ डिसेंबर पासून, तर लोणावळा शहरात ता.१३ डिसेंबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

लोणावळेकर नागरिकांकडून भांगरवाडी, गावठाण, खोँडगेवाडी, ठोँबरेवाडी, पोर्टरचाळ  असे आलटून पालटून उपोषण सुरू असून आज वलवण पुरूष विभागाच्यावतीने आंदोलन सुरू असल्याचे दिसले.
औंढेखुर्द , औंढोली ग्रामस्थांतर्फे आयोजित साखळी उपोषणाचे मधे आज खाडेवाडी मधील महिला भगिनी , औंढोली येथील छञपती शिवाजी महाराज चौक भागातील महिला भगिनी , मुली यांनी उपोषणस्थळी गाणी अभंगाचा गजर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!