ताज्या घडामोडी

कापरी येथे कृषी विभागामार्फत पाचट व्यवस्थापन अभियान .

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

कापरी. ता.शिराळा येथे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत 1जानेवारी ते 7जानेवारी या कालावधीत धुरमुक्त गाव संकल्पने अंतर्गत ऊस पाचट व्यवस्थापन अभियान सप्ताह कार्यक्रम पार पडला.
मौजे कापरी येथील प्रगतशील शेतकरी श्री. शिवाजी किसन पाटील. सर यांच्या शेतावर ऊस खोडवा पिकात पाचट न जाळता ट्रॅक्टर चलित पाचट कुट्टी यंत्राद्वारे ऊस पाचटाची कुट्टी केलेल्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी श्री. जी.एस.पाटील. यांनी ऊस खोडवा पिकात पाचट व्यवस्थापनाचे जमिन व पिकास होणारे फायदे व त्याचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच श्री मोहन पाटील, माजी सरपंच बाजीराव पाटील, मंडल कृषी अधिकारी श्री. सुभाष घागरे, कृषी सहाय्यक श्रीशैल अजेटराव, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल माळी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विकास बजबळकर ,जनाईदेवी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष अमोल पाटील, सचिव प्रसाद पाटील व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!