ताज्या घडामोडी

नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या माध्यमातून चेंबूरमध्ये गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

Spread the love

होम मिनिस्टर ‘ फेम लाडके भावोजी

आदेश बांदेकर यांची विशेष उपस्थिती

मुंबई – स्व. मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला वार्ड क्रमांक १५३ चे कार्यसम्राट नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या माध्यमातून चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील तब्बल १०० गरजू महिलांना सिद्धीविनायक मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष आणि “होम मिनिस्टर’ फेम महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

यावेळी आदेश बांदेकर यांनी आपल्या भाषणात नगरसेवक अनिल पाटणकर यांनी गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचा गौरव करत असेच सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा मुंबईवर भगवा झेंडा फडकावल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख मंगेश सातमकर यांनीही शिवसैनिकांनी पक्षाचे काम लोकांसमोर आणून आगामी पालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास आदेश बांदेकर,विभाग प्रमुख मंगेश सातमकर,कार्यक्रमाचे आयोजक नगसेवक अनिल पाटणकर ,महिला विभाग संघटिका रिता वाघ,महिला उपविभाग संघटिका सुलभ पात्याने ,चेंबूर विधानसभा संघटक अविनाश राणे, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला संघटिका अनिता महाडिक,समाजसेविका मीनाक्षी पाटणकर,ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग, कार्यालय प्रमुख मारुती वाघमारे,युवासेना शाखाधिकारी विनय शेट्ये आणि सर्व महिला,पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!