राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इस्लामपूर नगर पालिकेची पंचवार्षिक निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तयारीनिशी लढविणार

Spread the love

इस्लामपूर दि.११ प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इस्लामपूर नगर पालिकेची पंचवार्षिक निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण तयारीनिशी लढविणार आहे. इच्छुक कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांनी शुक्रवार दि.१५ जुलै २०२२ पर्यंत आपले अर्ज छापील नमुन्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ओबीसी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना २७ टक्के उमेदवारी दिली जाणार असल्याची घोषणा आ.जयंतराव पाटील यांनी केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
इस्लामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात छापील नमुन्यातील अर्ज उपलब्ध केलेले आहेत. इच्छुक कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी हे अर्ज घेवून ते पूर्ण भरून पक्ष कार्यालयात दि.१५ जुलैपर्यंत सादर करावेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्र पवार,आमचे नेते आ.जयंतराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्वजनिक कामाची आवड असणाऱ्या समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही राजकारणात यावे,असा प्रयत्न आहे. तरी सामाजिक,शिक्षण,आरोग्य,कायदा,सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आपले अर्ज छापील नमुन्यात सादर करावेत.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आपणा सर्वांनाच न्यायालयीन निर्णयाची प्रतिक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळायला हवे,या समाजाला न्याय मिळायला हवा,यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमा तून सनदशीर मार्गाने प्रयत्नशील आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारां पैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनीही छापील नमुन्यातील अर्ज पक्ष कार्यालयात सादर करावेत,असे आवाहनही श्री.पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!