अध्यात्मिकक्रीडा व मनोरंजनसामाजिक

लोणावळ्यात गुलालाची, भंडारा व फुलांच्या पाकळ्या यांची तोफेतून उधळण..

सव्वा आठ तास मिरवणुकीने गणरायाला निरोप.

Spread the love

लोणावळ्यात गुलालाची, भंडारा व फुलांच्या पाकळ्या यांची तोफेतून उधळण ; सव्वा आठ तास मिरवणुकीने गणरायाला निरोप.In Lonavala, gulalachi, bhandara and flower petals are thrown from a cannon; Farewell to Ganaraya with a procession of eight and a half hours.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी, २९ सप्टेंबर.

लोणावळ्यात गुलालाची, भंडारा व फुलांच्या पाकळ्या यांची तोफेतून उधळण करत ढोलताशांच्या दणदणाटात व बँजो , बँडचे तालात सुमारे सव्वा ते साडे आठ तास मिरवणुकीने गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या, अशी साद घालत , भावूक होत भाविकांकडून गणपतीबाप्पाला वाजतगाजत निरोप दिला.

मानाचा पहिला गणपती श्री रायवूड गणेश मंडळाचा गणपती आकर्षक रथावर लालटाकी येथील मंडपापासून सायंकाळी पाच वाजता निघाला , पावणे सहा वाजता मावळा पुतळा येथे मावळा पुतळ्यास पुष्पहार मान्यवरांचे हस्ते घालून आरती म्हणत व श्रीफळ फोडून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
यावेळी प्रशासकीय अधिकारी पंडीत पाटील व लोणावळा उपविभागीय पोलिस आधिकारी कार्यालयाचे आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे हस्ते नारळ फोडून मिरवणुकीला प्रारंभ झाला.

श्री रायवूड गणेश मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष विलासभाऊ बडेकर , उपाध्यक्ष मारूती देशमुख तसेच सर्व पदाधिकारी वेळी उपस्थित होते.मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान झाला होता.मंडळापुढे श्री सिध्दीविनायक ढोलताशा पथक शोभा देत होते. राञी नऊ वाजता भाजीमंडईतील चौकात गणपती आला.पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती श्री तरूण मराठा मंडळाचा गणपती आकर्षक विद्युत रोषणाईचे रथामधे आला. या मंडळाचे गणपतीसमोर गावठाण मधील ” शारदा ढोल ताशा पथक ” शोभा देत होते. महिला व मुलींचाही ढोल वाजवण्यात सहभाग होता.मंडळाचे मानद अध्यक्ष  रमेशचंद्रजी व्यास, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष अमित गवळी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.या वर्षी संत तुकाराम महाराज यांचा हालता देखावा मिरवणुकीत व ह.भ.प.नामदेव महाराज आगे यांचे बालवारकरी दिंडी पथक शोभा देत होते.

मानाचा तिसरा गणपती श्री संत रोहिदास महाराज मिञ मंडळाचा गणपती आकर्षक रथावर आला. या गणपतीपुढे श्रीमंत ” हे ढोलताशा पथक शोभा देत होते.
मंडळाचे मानद अध्यक्ष उमेश तळेगावकर व अध्यक्ष करण गरूडे तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मानाचा चवथा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा , गवळीवाडा येथील गणपती आला.या मंडळाचे अध्यक्ष श्री. लोखंडे, पदाधिकारी माजी नगरसेवक निखिल कविश्वर , तसेच शेकडो खेळाडू यांचे ढोल ताशा पथक मिरवणुकीत शोभा देत होते.

मानाचा पाचवा गणपती श्री शेतकरी भजनी मंडळाचा गणपती मंडळाचा , वलवण येथून आकर्षक रथावर आला. गावातीलच ढोलताशा पथक मिरवणुकीत शोभा देत होते.
मानाचा सहावा गणपती श्री राणाप्रताप नेताजी मिञ मंडळाचा आकर्षक फुलांचे व विद्युतरोषणाई चे रथावर आला. गावठाण येथील ” भैरव गर्जना ” हे ढोलताशा पथक शोभा देत होते.

मानाचा सातवा श्री गजानन मिञ मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान झाला होता. येथील मोरया ढोलताशा पथक मंडळाचे मिरवणुकीत शोभा देत होते.
मानाचा आठवा खाजगी गणपती दगडू विठू भोमे यांचा आकर्षक रथावर आला. आखिल भाजी व फळ मंडईचा गणपती आकर्षक विद्युतरोषणाई चे रथावर आला.रथापुढे श्री गुरूदत्त ढोलताशांच्या पथकाने शोभा आणली. मंडळाचे आध्यक्ष राजूशेठ बोराटी व पदाधिकारी अशोक सैदापुरे , चंद्रकांत गदादे आदी उपस्थित होते.

पाठोपाठ पी.डी.आडकर यांचा खाजगी गणपती रथावर विराजमान होता.कारकेवाडी येथील ओमसाई ढोलताशा पथक यांचा डाव रंगत होता. या गणपतींचे रथामागे महाराष्ट्र मातंग समाज गणेशोत्सव मंडळाचा गणपती ११ व्या क्रमांकाला होता. तुंगार्ली येथील विघ्नहर्ता हे ढोलताशा पथक गणपतीपुढे आकर्षक खेळताना , वाद्यकामात मग्न झाले होते.

मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष बंटी बोभाटे , व पदाधिकारी यवेळी उपस्थित होते. यावेळी सोमनाथ बोभाटे व युवा खेळाडू अशोकराव बोभाटे लाठीकाठीचा खेळ करून प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत होते.या पाठोपाठ बाराव्या क्रमांकाचा श्री नवयुग महाराष्ट्र मंडळाचा गणपती आकर्षक सात आश्वांचे विद्युतरोषणाई रथावर आला.गोविञीतील शिवगर्जना ढोलताशा पथक शोभा देत होते.
पाठोपाठ पोर्टर चाळीतील श्री साईआझाद मिञ मंडळाचा गणपती आकर्षक रथात आला. मंडळाचे मानद आध्यक्ष सुनिलभाऊ पटेकर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाठोपाठ क्रमांक १४ चा श्री शिवाजी उदय मिञ मंडळाचा गणपती आकर्षक रथावर आला. पदाधिकारी संदिप वर्तक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पाठोपाठ मावळचा राजा श्री शिवाजी मिञ मंडळाचा गणपती आकर्षक मयुर रथावर आला. या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशशेठ चौहाण , उत्सव अध्यक्ष प्रकाशाशेठ पोरवाल , व कार्याध्यक्ष मोहन वाघमारे , सचिव राजूशेठ चौहाण , मुख्यसंरक्षक चेतन चौहाण , दिलीप पवार , राजेंद्र टाटीया आधी पदाधिकारी मिरवणुकीत उपस्थित होते. ” तिरंगा ” हे नांगरगावातील तरूण तरूणींचे ढोलताशा पथक मिरवणुकीत आकर्षक पोशाख घालून वाद्यकाम करत होते.
या पाठोपाठ तुंगार्ली येथील ओमकार तरूण मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान झाला होता. या गावातीलच ” हिंदुत्व ” हे ढोलताशा पथक मिरवणुकीत ढोलताशांचा कडकडाट करत डोळ्यांचे पारणे फेडत होते. मंडळाचे पदाधिकारी यावेळी एकाच पोशाखात होते.लहान चिमुरड्या खेळाडूनी लोकांचे लक्ष वेधले होते.
पाठोपाठ श्री तुफान मिञ मंडळाचा गणपती होता. आकर्षक रथावर विद्युतरोषणाई , व फुलांच्या सजावट असलेल्या रथावर गणपती होता.

पाठोपाठ क्रमांक २० ला श्री आष्ठविनायक मिञ मंडळाचा गणपती होता.श्री आष्ठविनायक मिञ मंडळाचे गणपतींचे पुढे आई एकविरा मुझिकल ग्रूप , खोपोली हा शोभा देत होता.
या नंतर सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेला श्रीमंत नेहरू मिञ मंडळाचा गणपती आला. काशी विश्वनाथाचे जिवंत देखावे व श्री राधा कृष्ण रथावर गणपती आकर्षक मिरवणुकीमधे शोभा देत होता. यामधे मंडळाचे मानद अध्यक्ष हिराचंद ओसवाल , अध्यक्ष सुनिलशेठ लुणावत व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.
मिरवणुकीत रथापुढे जय हनुमान ढोलताशा पथक , ठोंबरेवाडी व श्री गुरूदत्त तरूण मंडळ , दत्तवाडी यांचे ढोलताशा पथक शोभा देत होते.

मिरवणुका सुरू झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता मावळा पुतळ्यापासून विविध संस्था , मंडळे , नगरपरिषद , राजकीय पक्षांनी व्यासपीठ उभारून कुणी चहा वाटप केला , कुणी पुलाव वाटप केला.कुणी भेळ व पाणी , चहा यांचे वाटप केले.लोणावळा व्यापारी असोसिएशन तर्फे मावळा पुतळ्याचे पासून काही अंतरावर स्वागतकक्ष उभारला होता.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांचाही साधना काॕम्प्लेक्स समोर स्वागतकक्ष होता. येथे श्री रामदेवबाबा भक्त मंडळाने २५ पोती मुरमुरे व २५० किलो फरसानची भेळ वाटप केली.तसेच येथे लायन्स क्लब आॕफ लोणावळा खंडाळा यांचेकडून सर्व गणपती मंडळांचे पदाधिकारी, ढोलताशा पथकांचे खेळाडू , प्रेक्षकांना चहा वाटप करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने भाजीमंडई गणपती समोर भव्य स्वागतकक्ष उभारून तेथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव मंजुश्री वाघ , शहर कार्याध्यक्ष रवि पोटफोडे , युवकचे शहराध्यक्ष विनोद होगले , शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर आणि पदाधिकारी यांचेतर्फे सर्व गणपतींचे मंडळांना व ढोलताशा पथकांचे अध्यक्षांना स्मृतीचिन्हे वाटप केली व यावेळी त्यांचे स्वागत केले.लोणावळा नगरपरिषद स्वागतकक्ष येथे प्रशासकीय अधिकारी पंडीत पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , राजूशेठ बच्चे , अधिकारी व पञकार संघाचे पदाधिकारी यांचेकडून स्वागत करण्यात आले.

काँग्रेस आय यांचे स्वागतकक्ष मधून शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल, पूजा गायकवाड, तसेच पदाधिकारी रवि सलोजा, व पदाधिकारी यांनी स्वागत केले.भारतीय जनता पक्षाकडून स्वागतकक्ष उभारला होता.यावेळी महिला शहराध्यक्षा योगिता कोकरे व नवीन शहराध्यक्ष अरूण लाड, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे हस्ते मंडळांचे स्वागत करण्यात आले. माजीमंञी बाळाभाऊ भेगडे हेही या ठिकाणी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचेतर्फे शहराध्यक्ष भारत चिकणे, पदाधिकारी यांचेकडून ही सर्व मंडळांचे स्वागत करण्यात आले.

सत्यानंद तीर्थधाम येथील श्री आमृतनाथजी स्वामी यांचेतर्फे येथे अन्नदान करण्यात आले.जयचंद चौकामधे शिवसेना शहराच्या वतीने भव्य स्वागतकक्ष व अन्नदान कक्षामधून हजारो किलो तांदळाचा पुलाव भात व पाणी वाटप करून गणेशभक्तांची सोय केली होती.यावेळी तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे, शहराध्यक्ष बाळासाहेब फाटक , माजी नगरसेविका कल्पनाताई आखाडे , युवा सेना तालुका समन्वयक विजयभाऊ तिकोणे, राम थरकुडे, माजी नगरसेवक माणिक मराठे, उपजिल्हा प्रमुख सुरेशभाऊ गायकवाड तसेच असंख्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. बडोदा बँकेसमोर श्री.सत्यनारायण मंदिर चॕरिटेबल ट्रस्टतर्फे व मावळवार्ता फौडेशन तर्फे हजारो कप चहा व बिस्किटे यांचे गणेश भक्तांना वाटप करण्यात आले.यावेळी व्यासपीठासमोर नितीनशेठ आगरवाल,पञकार संजय आडसुळे, उद्योजक राजूशेठ सोनवणे, माजी नगराध्यक्ष संजय सोनवणे, बंबोरी, प्राचार्य कुमार धायगुडे, प्रदिप वाडेकर आदी उपस्थित होते.येथून गणरायाचे मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते.

राञी सह्याद्रीनगर येथील कृतीम हौदाजवळ पावणे एक वाजता क्रमांक तेरा श्री साईआझाद व महाराष्ट्र मातंग समाज मंडळाचे गणपती विसर्जन घाटावर आले. काही गणपती टाटातलावातील पाण्यात विसर्जन करण्यासाठी रवाना झाले.अडीच वाजता शेवटचा इराणीचाळ येथील गणपती विसर्जित करण्यात आला. काही गणपतींचे रथापुढे गणेश
मंडळाने खोपोलीतील बँजोपथक आणली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली नशामुक्ती अभियान राबविण्यात आले.आनेक गणपती मंडळे व स्वागतकक्ष यांचेकडून शंभरटक्के प्रतिसाद या आभियानाला मिळाला.

श्री सत्यनारायण कमिटीचे व्यासपीठावर याबाबत आयपीएस आधिकारी श्री.कार्तिक यांनी भाषण केले.त्यांचा यावेळी सत्कार पदाधिकारी यांनी स्मृतिचिन्ह व शाल देवून केला. कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलिस स्टेशनचे पोलिसनिरिक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामिणचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी यांनी सुमारे शंभर पोलिसांचे पथकाकडून चोख कडक बंदोबस्त ठेवला होता , त्यामुळे कोणताही आनुचित प्रकार घडला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!