कोंडाईवाडी कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
शिराळा प्रतिनिधी / कोंडाईवाडी ता.शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत भाजप नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मा.सत्यजित देशमुख भाऊ, भाजपा तालुकाध्यक्ष मा.हणमंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील ज्येष्ठ नागरिक प्रसिद्ध उद्योजक भाऊसाहेब सावंत, दत्तकृपा ट्रान्सपोर्ट संस्थापक अध्यक्ष संतोष सांवत,राजेश सांवत,गोरख सांवत,अशोक सांवत,भिमराव राजाराम सावंत, उपमहाराष्ट्र केसरी संजय सांवत,राजाराम सावंत, मुंबई माथाडी कामगार वाहतूक संघटना अध्यक्ष किसन सांवत,यांनी प्रवेश केला.
यावेळी कारखाना व्हाईस चेअरमन प्रतापराव यादव, माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत पाटील, सहकारी रणजित नाईक भैय्या,सम्राट शिंदे,किरण पाटील,रणजीत कदम,आदी प्रमुख उपस्थित होते.
सेवा सोसायटी चेअरमन आत्माराम सावंत,सुरेश पडवळ,उत्तम पाटील, सर्जेराव सावंत, बापू लाड,सुरेश आनंदा पाटील, सुरेश केशव पाटील, विलास पाटील, प्रदीप पाटील, सुनील सावंत,अशोक पाटील, यशवंत सावंत, वसंत पाटील, श्रीपती पडवळ,दादा पाटील, बी.आर.पाटील,राजाराम सावंत आदी उपस्थित होते.