ताज्या घडामोडी

सांगली अर्बन को. ऑफ बँक लि, सांगली या बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

Spread the love

सोमवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता सांगली अर्बन को ऑफ बँक लि, सांगली या बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या इस्लामपूर, ता. वाळवा येथील शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले.

सांगली अर्बन को ऑफ बँक लि, सांगली या बँकेच्या संचालक मा. डॉ. सई मंद्रुपकर यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बँकेचे संस्थापक मा. कै. म. ह. तथा अण्णासाहेब गोडबोले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून करण्यात आला.

भारत रत्न, गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना बँकेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रक्तदान संकलन राजारामबापू पाटील रक्त पेढी इस्लामपूर च्या वतीने करण्यात आले. यावेळी २५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
यावेळी बँक शाखा सल्लागार श्री.बजरंग कदम, एल. एन.शहा, अरविंद पाटील, पी.एम.जोशी, सुभाष शिंगण तसेच डॉ, गोरख मंद्रुपकर, संजय भागवत, नरेंद्र सुर्यवंशी, मिलिंद देशपांडे, नंदकुमार पवार, रविंद्र जाधव, दिलिप माळी, सर्जेराव जगताप, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक बँकेचे शाखाधिकारी मा. जे.आर.पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप पाटील, अरूणभाऊ विरकर, सूरेश कुंभार, रमेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.कोरोणा साथीच्या आजाराचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून कार्यक्रम संपन्न झाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!