ताज्या घडामोडी

उद्या सायंकाळी 6 वाजता शिराळ्यात कॅप्टन रामभाऊ लाड अभिवादन सभा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या चळवळीतील अग्रगण्य आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेचे कॅप्टन रामभाऊ लाड (गाव: कुंडल) यांचे काल निधन झाले.शिराळा आणि वाळवा तालुक्याला प्रतिसरकार चा धगधगता इतिहास आहे. काल या स्वातंत्र्याच्या चळवळीतील एक तारा निखळला.शिराळा येथे कॅप्टन रामभाऊ लाड यांना अभिवादन करण्यासाठी उद्या दि. 8 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता शिराळ्यात शोकसभा घेण्यात येणार आहे.ज्यामधे कॅप्टन रामभाऊ लाड यांचे स्वातंत्र्याच्या चळवळीतील योगदानाबद्दल चर्चा होणार आहे.असे प्रतिपादन सुधीर दाभाडे.,अंनिस युवक कार्यवाह विभाग, सांगली जिल्हा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!