ताज्या घडामोडी

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डीत सम्मान

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी:-शिर्डी काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस केंद्रीय कार्यकारी समितीचे सदस्य तथा माजी केंद्रीय रेल्वे मंत्री के.एच. मुनी अप्पा व कर्नाटक काँग्रेस कमिटीचे सरचिटनिस शहानाज साहेब शिर्डीत साई दर्शनाकरीता आले असता शिर्डी काँग्रेस च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिर्डी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल कोते जिल्हा काँग्रेस चे सर चिटणीस उमेश शेजवळ काँग्रेस उद्योग आघाडीचे अध्यक्ष गोविंद कोते शिर्डी युवक शहराध्यक्ष Advocate अविनाश शेजवळ युवक काँग्रेस चे शिर्डी उपाध्यक्ष चंद्रभान पवार युवक काँग्रेस चे तालुका उपाध्यक्ष दत्ता त्रिभुवन विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष सौरभ हडवले विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन यांच्यासह जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभाग कमिटीचे सदस्य रामभाऊ पिंगळे लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष व पिंपरने चे सर पंच मंजाबापू साळवे लहुजी सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विश्वदीप पिंगळे यांच्यासह आदी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी हजर होते.यावेळी के.एच. मुनी अप्पा यांनी
मनोभावे दर्शन घेतल्यानंतर नगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकीला असल्याने या जिल्ह्यातून अनेक खासदार आमदार मंत्र्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सत्ता भोगलेली आहे या पुढील काळातही काँग्रेसला चांगले दिवस येणार असून देशातील सर्व सामान्य जनता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी खासदार राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सर चिट निस प्रियंका गांधी यांच्या विचाराने जनता चांगल्या मार्गावर येत आहे म्हणून 2024 ला पुन्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!