ताज्या घडामोडी

राज्यात आँनलाईन, आँफलाईन परीक्षेचा मांडला खेळ* *१०,१२ परिक्षेवरचं का करतायत राजकारण विद्यार्थ्यांचा सवाल

Spread the love

फिरोज तडवी

मागील दोन वषार्पासून कोरोना विषाणूची भीती घालून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद केले होते. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा देशातील राज्यातील सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी खेळ मांडला आहे. आनंदाने शाळेत जाणारे मुलं, मुली आज त्याना शाळेत जाताना अवघडल्या सारखे वाटत आहे. कधी शाळा चालू केल्या जाते, तर कधी अचानक कोरोना विषाणुची भीती घालून बंद करण्यात येत आहेत.
देशात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून शाळा महाविद्यालये बंद करून ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. जेणेकरून विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. परंतु या ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होताना दिसून येत आहे. त्याच बरोबर देशातील ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधा नसल्याने लाखो ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहीले. ऑनलाईन शिक्षणामध्ये राजकारणी आणि षडयंत्री लोकांनी शिरकाव केल्याचे पहायला मिळत आहे. नुकतेच हिंदुस्थानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावण्याचं काम केल. शिक्षण ऑनलाईन तर परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावा यासाठी विद्यार्थी रस्त्यावर आंदोलन करताना दिसून येत आहेत.
राज्यात विद्यार्थ्यांच्या जीवना विषयी जी लोक खेळ खेळत आहेत, त्याविषयी राज्यात विद्यार्थी, पालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. यापुढे जर विद्यार्थ्यांनी आनलाईन शिक्षणाचा अट्टाहास धरला त्याचे दुष्परीणाम येणाऱ्या पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. गेल्या दोन वषार्पासून विद्यार्थी हातात पेन आणि वही अधुन मधुन घेत आहेत. त्यामुळे लिखाण करण्याचा सराव नसल्याने ऑफलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. अजून काही दिवस असेच चालू राहीले तर लिखाण करणे विद्यार्थी विसरून जातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीच्या भडकाऊ विधानाला बळी न पडता आपलं स्वताःच उज्वल भवितव्य साकार करण्यासाठी सदसदविवेक बुद्धीचा वापर करून शिक्षणाच्या प्रवाहात स्वताःला झोकून दिले पाहीजे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, ऑफलाईनचा विचार न करता अभ्यास केला तरचं पुढील जीवन योग्य मार्गावर जाईल अन्यथा स्वतःचे जीवन तर उद्धवस्त होईलचं, सोबत देशाचही मोठ नुकसान होईल असं पालक तसेचं नागरीकांमधून बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!