आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

अपहरण झालेल्या सतरा वर्षीय पीडित मुलीची सुटका करण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश

Spread the love

लोणावळा : ओडिसा राज्यातून अपहरण करण्यात आलेल्या एका 17 वर्षीय पीडित मुलीची सहीसलामत सुटका करण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.नवलाख उंबरे (ता. मावळ) येथून या मुलीची सुटका करण्यात आली.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अपहरण झालेल्या मुलीची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळवली. ओडिसा येथील सिमुलिया या ठिकाणाहून सतरा वर्षे मुलीचे अपहरण करून तिला नवलाख उबरे येथे एका खोलीत बंदिस्त करून ठेवण्यात आले होते. तिला सोडवून ताब्यात घ्या असे आदेश मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहाय्यक पोलीस फौजदार बोकड, पोलीस हवालदार जांभळे, महिला पोलीस हवालदार घुगे यांचे पथक तयार केले. या पथकाने मोबाईल टॉवरच्या लोकेशनच्या आधारावर नवलाख उंबरे येथे पोहोचून तेथील स्थानिकांच्या मदतीने पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर याबाबत एमआयडीसी स्थानिक पोलिस स्टेशन यांना माहिती दिली.

पोलीस अधिक्षक देशमुख, पोलीस उप अधीक्षक घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पीडित मुलीला बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले. सध्या तिला चैतन्य महिला आश्रम, मोशी याठिकाणी सुखरूप ठेवण्यात आले आहे. सदरची माहिती ओडिशा येथील संबंधित पोलिस ठाण्यात कळविण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!