ताज्या घडामोडी

इस्लामपूर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लखनीय कामगिरी.

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा ) 

चार चाकी गाडी चोरणाऱ्या 37 (सदत्तीस) गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपीस इस्लामपूर डी. बी. शाखेने 48 (आट्टेचाळीस) तासात केले जेरबंद.अरोपीने तब्बल एकवर्ष पुणे ग्रामीण पोलीस ,तसेच सांगली ,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांच्या हातावर दिल्या होत्या तुऱ्या…..सविस्तर असे की, इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरणाच्या शाखेचे नेहमीच कौतुकास्पद कामगिरी असते. सदरच्या गुन्ह्यातील आरोपीला गेल्या एक वर्षे सांगली,सातारा,कोल्हापूर,आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाणे सातत्याने शोध मोहीम राबवीत होते,परंतु सदरचा अरोपी सर्वाच्याच हातावर तुऱ्या देत होता पण सिंघम स्टाईल मध्ये इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरणाच्या टीमने अखेर आरोपीस केले जेरबंद. मा.पोलीस अधीक्षकसो श्री.दीक्षितकुमार गेडाम साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक सौ.मनीषा दुबुले मॅडम यांनी चोरी,घरफोडी ,जबरीचोरी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकीस आण्याबाबत सूचना दिल्या होत्या,त्याचप्रमाणे इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत आष्टा नाका परिसरात दि. 31/१/२०२२ रोजी श्री.भास्कर मोरे यांचे श्री माणकेश्वर मोटर गॅरेज मध्ये लावलेली चार चाकी बोलोरो कार कोणी आज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेबाबत इस्लामपूर पोलीस ठाणेत गुरुन. ७४/२०२२ भादविस ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.त्याचप्रमाणे श्री.कृष्णात पिंगळे सो,उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांचे मार्गदर्शनाखाली ,श्री.शशिकांत चव्हाण ,पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणे कामी पतक नेमून योग्य त्या सूचना दिल्या,त्या प्रमाणे इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सपोनि प्रवीण साळुंखे ,पोहेकॉ/ दीपक ठोंबरे ,पोना/अरुण पाटील ,पोशी / आलमगीर लतीफ यांनी इस्लामपूर शहरातील सि. सि.टी.व्ही.ची सखोल पाहणी करून आज्ञात आरोपी हे पेठच्या दिशेने गेल्याचे दिसल्याने त्याप्रमाणे पुढे जाऊन पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर पर्यंत आहोरात्र ठिकठिकाणचे सि.सि.टी.व्ही.फुटेज चेक करत आरोपीचा .माग निघाल्याने खेड शिवापूर येथे एक दिवस मुक्कामी राहून रामनगर परिसरात गस्त घालत असताना सदर आरोपी मिळून आले.त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणेत आणून चौकशी केली असता गुन्ह्यांची कबुली दिली आहे.तसेच सदर आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर,सांगली शहरातून ,सातारा शहरातून,त्याचा जोडीदार १) नितीन शामराव समुद्रे रा.वाकड ,पुणे २)अनंत पुणवत यादव रा.अहमदनगर यांचे मदतीने बोलोरो वाहने चोरून एकूण ०५ गुन्ह्यांची कबुली दिली असून सदर गुन्ह्यातील आरोपीची नावे १) राजू बाबुराव जावळकर वय ५४ वर्षे रा.खानापूर ता.हवेली ,जि.पुणे यास दि. ०४/०२/२०२२ रोजी मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो इस्लामपूर यांच्या समोर हजर केले असता त्यास ०७ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.तसेच यातील आरोपी नावे १)नितीन शामराव समुद्रे व २) अनंत पुणवत यादव हे दोघे फरारी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.तसेच अटकेतील आरोपी राजू जावळकर यांचे कडून महाराष्ट्रात आणखी काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सदरची कारवाई मा.श्री.कृष्णात पिंगळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शशिकांत चव्हाण ,पोलीस निरीक्षक ,इस्लामपूर पोलीस ठाणे ,इस्लामपूर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे ,पोहेकॉ /८१९ दिपक ठोंबरे ,पोना/ १७३३ अरुण पाटील ,पोकॉ/ १३१७ आलामगिर लतीफ ,पोना /संग्राम गायकवाड ,पोशी/ अमोल सावंत ,सायबर पोलीस स्टेशन कडील पोशी/ कॅप्टन गुंडेवाड ,तसेच खेद- शिवापूर पोलीस चौकीचे पोहेकॉ / संतोष तोडकर यांनी केली आहे .सदर गुन्ह्याचा पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोना/१७३३ अरुण पाटील हे करीत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!