क्रीडा व मनोरंजन

वैभवचे आक्रमक शतक

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

ठाणे – वैभव सटणाचे नाबाद आक्रमक शतक आणि त्याने हर्ष आगवसोबत तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद १४६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अतुल फणसे आयोजित गजानन काशिनाथ फणसे स्मृती १९ वर्षाखालील मुलांच्या मर्यादित षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब कमिटीने दैवेज्ञ क्रिकेट क्लबचा ८ विकेट्सनी पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले.
दैवेज्ञ क्रिकेट क्लबने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भुषण सावंत (६३), तनय खानदेश (५२) आणि शिवम घोषच्या नाबाद ५५ धावांच्या खेळीमुळे ४२ षटकात ८ बाद २२० धावांचे आव्हान प्रतिस्पर्ध्यासमोर उभे केले. आर्यन शेनाळेने ४५ धावांत ३ आणि अमन भारती, आर्यन देशमुखने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्पोर्टिंग क्लब कमिटीचे दोन फलंदाज ७६ धावांवर माघारी परतले होते. त्यानंतर वैभव आणि हर्षने खेळपट्टीवर उभे राहत कुठलाही धोका न पत्करता संघाला विजय मिळवून दिला. वैभवने आपल्या आक्रमक नाबाद ११८ धावांच्या शतकी खेळीत १०९ चेंडूत ११ चौकार मारले. तर हर्षने ६३ चेंडूत पाच चौकार मारत नाबाद ५३ धावा केल्या. तनयने गोलंदाजीतही छाप पाडताना ४४ धावांत २ विकेट्स मिळवल्या. मुंबई क्रिकेट संघटनेने या स्पर्धेला पश्चिम विभागीय स्पर्धेचा दर्जा दिला आहे.

संक्षिप्त धावफलक : दैवेज्ञ क्रिकेट क्लब : ४२ षटकात ८ बाद २२० ( भुषण सावंत ६३, शिवम घोष नाबाद ५५, तनय खानदेश ५२, आर्यन शेनाळे ९-४५-३, अमन भारती ९-३-२१-२, आर्यन देशमुख ७-१-३९-२) ८ विकेट्सनी पराभूत विरुद्ध स्पोर्टिंग क्लब कमिटी : ३६.५ षटकात ८ बाद २२१ (वैभव सटाणा नाबाद ११८, हर्ष आगव नाबाद ५३, तनय खानदेश ८-४४-२)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!