राजकीय

येणेगुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सभासद नोंदणी मोहिमेस प्रारंभ

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता.१३ (प्रतिनिधी) : येणेगूर, ता. उमरगा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता.१३) मंत्री जयंतराव पाटील यांच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्रभर सभासद नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार यांच्या पुढाकाराने येणेगूर जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले. या सभासद नोंदणीकरिता जिल्हा उपाध्यक्ष भीमादादा स्वामी, तालुकाध्यक्ष संजय पवार, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष समसुद्दिन जमादार, ज्येष्ठ कार्यकर्ते नेताजी कवठे, माजी सरपंच आयुबभाई जवळगेकर, उपसरपंच राहुल बनसोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अप्पू हिप्परगे, माजी उपसरपंच वैभव बिराजदार , माजी सैनिक बसवेश्वर माळी, योगीराज स्वामी, दिपक हिप्परगे, मल्लिनाथ गायकवाड, संतोष बनसोडे, रमेश कागे, युनुस देशमुख, आसिफ मुल्ला, सुरेश पवार, आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर अभियान मोहिम पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!