क्रीडा व मनोरंजन

कामेरी  येथील रायगड ग्रंथालयाच्या वतीने  रविवार  २० फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त शिव मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

Spread the love

इस्लामपूर  दि 15 (वार्ताहर ) कामेरी ता वाळवा येथील रायगड ग्रंथालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त शिव मॅरेथॉन, स्पर्धा आयोजित  करण्यात आली आहे अशी माहिती संस्थापक शुभम पाटील यांनी दिली.

रविवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ .३० वाजता होणाऱ्या या स्पर्धेत १७ वर्षा खालील

लहान गटासाठी कामेरी बाजारपेठ ते शिवपूरी रोड  ४ किमी अंतर ठेवण्यात आले आहे.

पहिल्या ५ विजेत्यांना अनुक्रमे १५०० ,१०००

,७००,५००,३०० रुुपये व चषक तर १० जणांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येेेणार आहेत

तर खुल्या गटासाठी कामेरी बाजारपेठ ते शिवपूरी खिंड हे १० किमी अंतर ठेवण्यात आले आहे .यातील ५ विजेत्यांना अनुक्रमे २५००,२०००,१५००,१००० ,७०० रुपये. व चषक तसेच उत्तेजनार्थ १० बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रथम नोंदणी करणाऱ्या २०० स्पर्धकांना टी शर्ट व सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र दिले जाईल.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन रायगड ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे  स्पर्धेसाठी नोंदणी ठिकाण: समर्थ एंटरप्रायझेस दत्त चौक, कामेरी मो. ८६६८६४१०७१ अक्षय पाटील आराध्या मेडिकल भैरवनाथ चौक कामेरी मो. ९८२२४०४५७९ संदीप पाटील ऋतुजा प्रिंटर्स, बाजारपेठ, कामेरी. मो. ९०२८७०६०९० विजयसिंह जाधव इनामदार हार्डवेअर अॅण्ड इलेक्ट्रीकल, मोबा. ९८९०३४६२०२ नरसोबा चौक,अमर इनामदार,  या ठिकाणी नावंं  नोंदणी  करता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!